विलासराव देशमूख
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले.
मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो.
विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता.
मिसळपाव


दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच.