(१०, ००, ००,००, ००, ००,०००) : अबब आणि अरेरे !
मिपाच्या तांत्रिक पुनरुज्जीवनादरम्यान माझा हा पूर्वप्रकाशित लेख उडाला आहे. प्रशासकांच्या सूचनेनुसार तो पुन्हा प्रकाशित करतोय.
...................................................................................
मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता.
मिसळपाव