Skip to main content

एका अवलियाची भटकंती- किक स्कूटर

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/09/2022 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी या लेखात आपल्याला एका भटक्या अवलियाची ओळख करून देणार आहे. जगभर अशी अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत,वाचत,ऐकत असतो. पण असा अवलिया आपला "बॉय नेक्स्ट डोअर" असेल तर? माझा ट्रेकिंग मधील जुना परिचित वर्तकनगर ठाण्याचा रहिवासी राजेश खांडेकर हा असाच एका भटक्या. राजेशचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. पण साधारण १९९० पासून राजेशच्या सायकल मोहीम सुरु झाल्या. ठाणे वज्रेश्वरी -१२० कि.मी. ठाणे नाशिक -५२० कि.मी.

मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

लेखक Trump यांनी गुरुवार, 22/09/2022 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे.

लद्दाख

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 22/09/2022 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
भूशास्त्राच्या अंकलिपीची पाने इथली उलटी रंगभारले पहाड, अवघड रस्त्याची वेलांटी रण वाळूचे पायतळी अन् हिमकण माथ्यावरती किती विरोधाभास पचवुनी फुलते इथली सृष्टी रंग नभाचे प्राशुनी वाहे निवळशंख हे पाणी रौद्र नि प्रशांत उभय रसांचे मिश्रण केले कोणी (नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)

सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 22/09/2022 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रहो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील. या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे.

अलेक्सा झाssssली ...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 22/09/2022 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!" माझा नातू खच्चून ओरडत होता. मी जमेल तितका झटपट उठून बसलो. एकदम उभा राहिलो तर मला ब्लॅक आउट व्हायला होतं. बराच वेळ मी आडवाच असतो ना, म्हणून. एक मिनिट बसून मी उभा राहिलो. संतुलित होऊन बाथरुमकडे पावलं टाकत निघालो. मीही जाता जाता अलेक्सा अलेक्सा ओरडत राहिलो. काय झालं होतं मला कळेना.

कण अमृताचे......

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 21/09/2022 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही अमृत कणांचे आता, विष मी बनवत नाही

मिरची भजी

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 20/09/2022 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
च पाऊस तर काही जायचं नाव घेत नाही तेव्हा म्हटलं जे करायचे राहिले आहे.. ते मिरचीचे भजे आज करावे. अगदी झणझणीत!!! साहित्य: सात आठ कमी तिखट मिरच्या एक छोटी वाटी तांदळाचे पीठ एक मोठी वाटी डाळीचे पीठ जिरे ओवा, हिंग हळद चवीपुरतं मीठ हवा असेल तर खायचा सोडा मिरचीसाठी सारण- बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला. कृती: पहिल्यांदा मिरच्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात आणि मध्ये चिरून त्यातील बिया काढून घ्याव्यात. चिरलेल्या मिरच्या मीठ चोळून बाजूला ठेवाव्यात.

अबोला..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 20/09/2022 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या एका अबोल्यानं उदासली फुलदाणी. जीव झाला वेडापिसा आणि काळजाचं पाणी.. तुझ्या एका अबोल्याची कशी खुलावी रे कळी? सुचेनासे होते काही लोकं म्हणतात खुळी. तुझ्या एका अबोल्यात किती चंद्र गेले वाया.. अरे वेड्या, पाऊसही आता आला नं संपाया! तुझ्या एका अबोल्याशी आता माझाही अबोला, बघतेच किती वेळ झुलतो हा खेळझुला!

पोलिस मिरवणूकीत नाचले !!

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 20/09/2022 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cops-w… उन्माद भाव मनात साचले पोलिस मिरवणूकीत नाचले!! आयुक्त कुलवंत सरंगळ म्हणे हे सर्व आहे अमंगळ जास्त 'चूलबूल' करु नका 'पांडे' नाहितर सस्पेंड चे देवू डंडे. जास्त बनू नका गोविंदा व कान्हा कुठून आणायची सोनाक्षी सिन्हा?! आयुक्तांनी त्यांचे उपटले कान म्हणाले मी दबंग, तुम