Skip to main content

दावत-ए-बिर्याणी

लेखक पर्णिका यांनी मंगळवार, 13/09/2022 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
पांचाली आपल्या आजी-आजोबांसोबत कोलकत्ता शहरांत राहत असते. त्या तिघांच्या नात्यांत प्रेम, आपुलकी, काळजी तर आहेच पण त्यापलीकडेही जाऊन मोकळी मैत्रीही आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला आहे. तिची अमेरिकेत येण्याची तयारी सुरु असतांनाच त्या कुटुंबाला एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागते. आणि खास आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांचाली लखनऊला येते. तिला तिच्या आजीची बिर्याणीची (सिक्रेट) रेसिपी शोधायची आहे. त्यासाठी ती तिच्या आजीच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटते. या प्रवासात तिला तिच्या आजी-आजोबांची प्रेमकहाणी हळुवारपणे उलगडत जाते.

ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/09/2022 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.

ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 12/09/2022 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
न्यायाधीशांनी निकाल वाचला. 'त्या' पाच महिला नाचल्या. मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग. म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग ओवैसी ने केला थयथयाट. 1991 चा कायदा त्याला पाठ 'औवैसी, तू कितनी भी पटक ले' आताआहे हिंदू जनमत सटकले औरंग ने काढले होते फर्मान त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण एक मंदिर-भिंत तशीच ठेवली हिंदू-जखम धगधगत ठेवली कसले दाखले अन कसले पुरावे उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे शतकातून मग एक लोकोत्तर नेता 370, राममंदिर,आता काशी घेता याआधी न्यायदेवता होती आंधळी कुत्रं पीठ खातं,आणि आंधळं दळी आज हसला असेल तो शिव-नंदी संपलीती वोटबँक राजनीती गंदी आभार त्या पाच 'ज्ञानव्यापी' महिलांचे ज्यांनी
काव्यरस

तमिळनाडूचा इतिहास भाग - ७

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 11/09/2022 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
काँग्रेस बनवून तर झाली होती, अधिवेशनही होत होते. पण करायचं काय हे स्पष्ट नव्हतं. भारतीयांसाठी निवडणूक प्रक्रिया त्या वेळी नव्हती. दुसरी गोष्ट हि कि ते ब्रिटिशांसोबत सोबत काम करायचं म्हणत होते. पारसी आणि ब्राम्हण नेता, दोघांचा कम्फर्ट झोन हाच होता, कारण हे लोकं तळागाळातील आंदोलक नव्हते. हे तर त्यांचं एक पार्ट टाइम काम होतं कि वकिली वैगरे सोबत थोडी राजकारणाची चर्चा हि करता येईल. त्यांचे काही नेते इंग्रजांकडून पगारही मिळवत होते किंवा त्यांच्याशी संबंध बनवून होते त्यामुळे विरोध करायचा प्रश्नच नव्हता. पण बंकिमचंद्र चॅटर्जी ह्यांच्या आनंदमठ(१८८२) नंतर राष्ट्रवादी वातावरण तयार होऊ लागले.

ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 11/09/2022 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल.

मोदक-१

लेखक Bhakti यांनी शनिवार, 10/09/2022 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून बनवायचा घाट घातला.सुरुवातीला दहा प्रकार करायाचे ठरवले,पण वेळेनुसार काहीच प्रकार बनवता आले.हे मोदक मी सकाळच्या घाईत वीस मिनिटांतच बनवले आहेत. त्या वेळी जे साहित्य असेल ,जे कमी जास्त प्रमाण वापरून केले आहेत.तेव्हा त्यांची रेसेपी देणे जरा अन्यायकारकच होईल.ज्यांना हे मोदक बनवायचे आहेत त्यांनी नक्कीच युट्युबवर त्या त्या रेसिपीचा शोध घ्यावा. १.गव्ह्याच्या पीठाचे ,गुळखोबरे,सुकामेवा सारण असलेले तळणीचे मोदक m २.सफरचं

मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/09/2022 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर नमस्कार. आपण ठीक आहात अशी आशा करतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. अनेकदा आपण बघतो की, लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात (वस्तुत: कोणतंही मोठं सांगितलं जाणारं कारण हे एवढी मोठी गोष्ट करण्यासाठी नेहमीच किरकोळ असतं). कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 10/09/2022 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम पद्धतीने विकसित करण्यात आलेली बौद्धिक क्षमता. अलीकडील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. या बुद्धिमत्तेवर आधारलेलं यंत्र मानवाप्रमाणं स्वत: विचारही करू शकतं आणि परिस्थितीनुरुप निर्णयही घेऊ शकतं. कृत्रिम बुद्धिमत्तेची ऐतिहासिक पार्श्वभूमी इसवी सन पहिल्या शतकात ग्रीक वैज्ञानिक हेरोन यानं मानवाला त्याच्या कामात उपयुक्त ठरू शकणाऱ्या यंत्राचा उल्लेख केला होता. त्यानं काही यंत्र बनवलीही होती. त्यानं आपल्या ग्रंथांमध्ये 100 पेक्षा जास्त यंत्रांचं सचित्र वर्णन केलं होतं.

जळण नसलेल्या तिरडीवर...

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 10/09/2022 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
लेख केवळ मनोरंजन व स्वानंद हा उद्देश समोर ठेवून लिहीला आहे. खुप आधी लिहीला होता,अभद्र विषय असे लोकांचे म्हणणे. सणासुदीला कशाला अभद्र लिहायचे व आनंदावर विरजण टाकायचे म्हणून आता डकवत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर, काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ ll -संत नामदेव स्मायलींची बाराखडी शिकवल्या बद्दल @टर्मिनेटर भौं चे विषेश आभार. 😀😁 ______________________________ आजकाल मिपावर कवितेच्या दुकानाकडे रसिक कमीच फिरकतात दोन आकडी वाचक तीन आकडी जरी झाले तरी धन्य वाटते.मधूनच एखादी"तुला काय ठाऊक सजणी" दामिनी सारखी चमकून जाते.