Skip to main content

गणेशवंदना

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 06/09/2022 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशवंदना ------------- सृष्टीचा तू एक नियंता लंबोदरा तू एकदंता मोरया मोरया बुद्धिदाता वरदायका संकटमोचका विनायका प्रसन्न प्रेमळ भगवंता मोरया मोरया आनंदे नर्तन करिशी भक्ता हृदयी धरिशी कृपा असावी अनंता मोरया मोरया ------------------
काव्यरस

जीवू

लेखक भागो यांनी सोमवार, 05/09/2022 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
“जीवू, आज माझी काही अपॉइंटमेंट आहे?” जीवू हा त्याचा जीवश्चकंठश्च असा मित्र कम पर्सनल असिस्टंट रोबो. “यस्स सर. आज तुम्हाला डॉक्टर बगाराम, हार्ट स्पेशिअलिस्ट M.D. FRCP. ह्यांची भेट घ्यायची आहे. संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी. रात्री नऊ वाजता “ला थाळी” मध्ये क्लाएंट बरोबर डिनर.” “दोनी अपॉइंटमेंटसाठी ड्रेस कोड प्रमाणे कपडे तयार आहेत?” “माझी सूचना अशी आहे कि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी कॅज्युअल आणि डिनरसाठी कॅज्युअल एलेगंट असा ड्रेस ठीक राहील.” “जीवू, तू नसतास तर माझे काय झाले असते. अजून एक मे महिन्यात आराम करण्यासाठी गोव्याला जाईन म्हणतो.

श्री गणेश लेखमाला २०२२ - शहाणे करून सोडावे....

लेखक मी-दिपाली यांनी सोमवार, 05/09/2022 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;} p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;} .img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}

श्री गणेश लेखमाला २०२२शहाणे करून सोडावे....

रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली

लेखक Trump यांनी सोमवार, 05/09/2022 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली. -- आज श्री सायरस मिस्त्री मरण पावले. भारताच्या प्रगतीला हातभार लावणारा कोणीही मनुष्य असा टाळण्याजोग्या अपघातात मृत्यु पावला की भयंकर वेदना होतात. एक माणुस घडवायला ३० - ३५ वर्षे लागतात. अशी उमेदीत माणसे सोडुन गेली की आपले नशीब कसले कपाळकरंटे आणि अजुन किती भोग भारतमातेच्या नशीबात आहेत त्याची जाणीव घ्यायला आपला आवाका कमी पडतो. आपण भारतीय किती नालायक आहोत याची भयंकर सल मनाला लागुन जाते. असली विषण्णता लवकर मनातुन जात नाही. ह्या यादीत श्री विनायक मेटे, श्री वांजळे, श्री भक्ती बर्वे इ. अशी कितीतरी नावे टाकता येतील.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

लेखक अनुनाद यांनी रविवार, 04/09/2022 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

श्री गणेश लेखमाला २०२२ - गणेशोत्सव.. घरापासून दूर

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 04/09/2022 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;} p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;} .img-left {float:left;width:20%;margin-right:20px;} .field-items img {margin-top:16px;margin-bottom:16px;}

श्री ग

तमिळनाडूचा इतिहास भाग - ५

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 04/09/2022 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली. मी विचारलं- “आणी ब्राह्मण?” तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत.

पुस्तक परिचय: मनात -- भाग २ -- फ्रॉइड आणि मनोविश्लेषण

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 04/09/2022 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
---- वाचण्यापूर्वी: हा लेख "मनात" पुस्तकातील लिखाणावर आधारित असला, तरी, खरं म्हणजे वाचकांना "सिग्मंड फ्रॉइड" वाचायला प्रेरित करावं, म्हणून लिहिला आहे. आणि त्यासाठी "मनात" पुस्तकातून सुरुवात करायला हरकत नाही. लेखमालेतील याआधीचा लेख: पुस्तक परिचय: मनात -- भाग १ ----