Skip to main content

कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस !

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/08/2022 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
बायोलॉजीत जसे स्पेसिज-फायलम-सब फायलम असं वर्गीकरण असतं तसेच सेवानिवृत्त काकांचे फायलम असतात.त्यापैकी सहज आढळणारा म्हणजे - फायलम पासबुकीया ! या फायलममधले काका विविध देशी-विदेशी -सहकारी नागरी बँकांची पासबुकं सक्काळपासून अपडेट करण्यासाठी फिरत असतात. म्हणजे त्यांच्या खात्यात पैशाचा पूर आलाय वगैरे असं काहीच नसतं. दोन चार लाभांश-एखादा अ‍ॅन्युइटी प्लॅन - मासिक व्याज इतकंच काय ते जमा होत असतं पण त्यानिमित्ताने 'मेरीआवाज सुनो'हा कार्यक्रम त्यांना करता येतो. या पासबुकीयांच्या छळवादाला कंटाळून बँकानी पासबुकं छापायचं मशिन लावल्याची अशीही एक अफवा आर्थिक जगतात आहे.

एक किस्सा

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 26/08/2022 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक किस्सा असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे. अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते. हाच तो हाच तो संघी बौद्धिक कावा वगैरे बोलायला लागले. आणि भारतीय लोकांना वाईट खोड आहे की जे काही जगात आहे ते भारतीय लोकांनीच शोधले - ते तडतडलेच! मी म्हणालो माझा आणि संघाचा काही संबंध नाही. ते जरा थंड झाल्यावर त्यांच्या एका ज्युनियर डाव्याने विचारले की असे कसे बोलू शकता तुम्ही? अकाऊंटींग हे ईटालियन आहे. आणि त्यांनी ही पद्धती शोधून काढली. आणि याचे पुरावे आहेत.

खेला होबे

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 25/08/2022 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा PUBLISHED ON : 24 AUGUST 2022 AT 8:14 PM https://www.esakal.com/desh/school-recruitment-scam-cbi-raids-nbu-unive… शे बोल से खेला होबे, भाजपा बोल से एटा ना चोलबे .... काय म्हणत असतील स्वर्गात टागोर गुरुनाथ ? बघून कुलगुरु गेला आत !! कुलगुरु सुबिरेस भट्टाचार्य गल्लाभरु कसला भ्रष्टाचार्य कोलकाटा शिक्षक घोटाळा होलघाटा शिक्षणाचा वाटोळा पकडला पार्थ चॅटर्जी मंत्री तीन दिवस नोटा मोजती यंत्रे अटकेत मुखर्जी अर्पीता पार्थ सर्व क

सजलेल्या दख्खनच्या राणीतून प्रवास (भाग-1)

लेखक पराग१२२६३ यांनी बुधवार, 24/08/2022 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खनची राणी त्या दिवशी दख्खनची राणी प्रवासाला निघण्यापूर्वी कधी नव्हे इतकी सजत होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या तिच्या नेहमीच्याच फलाट क्र. 9 वर ती खूप लवकर येऊन उभी राहिली होती.

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 24/08/2022 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७ आधिचा भाग: कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६ "ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला..."

पुण्याजवळ, एकदम कमी पैशात होणारे रेंज ट्रेक

लेखक आंद्रे वडापाव यांनी मंगळवार, 23/08/2022 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
** उत्तराधिकारास नकार लागू ** सदर माहिती ही, आंतर्जालावरून गोळा करून इथे दिलेली आहे **या धाग्याचे प्रयोजन, हे ट्रेकच्या बाबतीत , मिपा वाचकांच्या मनात ब्रेनस्टॉर्मिंग सुरु करून देणे हा असुन ... **सादर माहितीच्या अचुकतेची कुठलीही शाश्वती नाही (जरी मी यातील ट्रेक स्वतः केलेले असले तरीही), वाचकाने स्वतःच्या रिस्कवर, ट्रेक करावा **हे ट्रेक करताना अगोदर पूर्ण माहिती घ्या, पाणी, जेवण बरोबर घ्या, माहितीचा माणूस बरोबर असेल तर उत्तमच.

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 21/08/2022 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२ मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी. ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे.

येऊर ते चिरमादेवी ते हावरेसिटी, ठाणे. पावसाळी भटकंती. (2022_08_19)

लेखक कंजूस यांनी रविवार, 21/08/2022 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
येऊर ते चिरमादेवी ते हावरेसिटी, ठाणे. पावसाळी भटकंती. (2022_08_19) ---------- सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्यांचा वावर आहे. बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ फिरतो. दुपारी आपल्या जबाबदारीवर जाऊ शकतो.

मामा भानझे डोंगर,ठाणे .पावसाळी भटकंती २०२२_०८_१८

लेखक कंजूस यांनी रविवार, 21/08/2022 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्याचा वावर आहे. बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ वावरतो. दुपारी जाऊ शकतो. ज्या मामाभानजे डोंगर भागात जाणार आहे तिथे दरगाह असल्याने माणसांचा दिवसा खूप वावर,येजा असते. तसा धोका नाही. करोना प्रतिबंध कमी होऊन वावर हल्लीच सैल झाल्याने आणि पाऊस चांगला झाल्याने इकडे १८ ओगस्टला गेलो होतो. मी गेलेलो मार्ग दिला आहे पण इतर कार,विमान, साधनांचाही उपयोग करू शकता.