Skip to main content

माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 19/08/2022 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे.

नर बळी

लेखक देवू यांनी गुरुवार, 18/08/2022 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वाक्यातील क्रियापद कोण सांगू शकेल? अख्ख्या वर्गाने हात वर केले , फक्त मी सोडून. उत्तर येत नसले तरी सर्वांबरोबर आपणही हात वर केल्यास आपल्याला विचारण्याची शक्यता कमी होत असल्याने बरेच जण तसे करायचे. मी हात वर न केल्याने मला बाई नक्कीच उत्तर देण्यासाठी विचारतील ह्याची खात्री होती. त्याला कारणही तसेच होते. मी कुठलेही मराठी व्याकरण न शिकता बालवाडीची मुलाखत मराठीत देऊन प्रवेश मिळवला होता.

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 17/08/2022 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६ आधिचा भाग: कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५ "कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो... " ----- दुपारी दोन वाजता बहिणीने जेवणासाठी उठवले.

बिग बुल

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी बुधवार, 17/08/2022 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.

हर घर तिरंगा, घर घर तिरंगा

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 16/08/2022 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच पार पडलेल्या ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ ह्या उपक्रमाला भारतीय जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहिला व मन आनंदाने व अभिमानाने भरून आले. ज्या पिढीने १९४७ ते २०२२, हा पंचाहत्तर वर्षांचा कालावधी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवाला व उपभोगीला ती पिढी भाग्यवानच म्हणायची, त्याच प्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी देखील तितकीच नशीबवान म्हणायची. ज्या तिरंग्याने आम्हाला हा बहुमान दिला त्याचे आभार मानावेत तेव्हढे कमीच आहेत. आता हा उपक्रम समाप्त झाल्यावर ह्या झेंड्यांचे काय करायचे हा प्रश्न मला तसेच माझ्या अनेक मित्र मैत्रिणींच्या मनात उद्भवणे स्वाभाविकच आहे.

अमरनाथ यात्रा--१

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 16/08/2022 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापुर्वीची आणी आताची. https://www.misalpav.com/node/50542/backlinks १. सन ऐंशीमधे अनुभवलेल्या अमरनाथ यात्रेतील अडचणी, सुखसोई व यात्रेकरूस आज उपलब्ध असलेल्या सोईंचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. २. क्लिक ३ कॅमेरात कैद केलेली छायाचित्रे काळाच्या ओघात लुप्त झाली, यंदा गेलेल्या यात्रेकरूने काही छायाचित्रे पाठवली आहेत व काहीअंतरजाला वरून घेऊन जुन्या आठवणींना उजळा द्यायचा प्रयत्न आहे. यात्रेकरूचे आणी आन्तर्जालाचे आभार. मागील भागातून...

येऊर - सोपी पावसाळी भटकंती

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 16/08/2022 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
येऊर - सोपी पावसाळी भटकंती

आपण यूट्यूबवर पावसाळी भटकंती, धबधबे याचे विडिओ पाहतो ते सर्व बहुतेक मोठ्या लोकांसाठी असतात. दहा वर्षांखालील लहान मुलांना नेण्यासाठी एखादी सोपी भटकंती करायची असेल तर ठाण्यातला येऊर/येवूर डोंगर म्हणता येईल. बरेच जण एखाद्या रिझॉटला किंवा वॉटरपार्कात जातात. तिथे सर्व कृत्रिम सोयी असतात पाण्यात खेळायच्या. पण खरेखुरे डोंगर,रान,पायवाट,झरे,आणि अधुनमधून येणारा पाऊस याची मजा थोडक्यात ,स्वस्तात घ्यायची असेल तर येवूरचा नक्की विचार करा.

कसे जावे

अलक १५ ऑगस्ट

लेखक मालविका यांनी सोमवार, 15/08/2022 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
अलक १ नेहमी सिग्नल वर सिझनप्रमाणे काही ना काही विकणारा १०/१२ वर्षाचा तो मुलगा. कधी पुस्तक, कधी फुगे तर कधी फुलं. १५ ऑगस्ट जवळ आला तशी १० तारखेपासून झेंडे विकायला लागला. कधी नव्हे ते यावेळी जास्तच झेंडे विकले जात होते.इतके की त्याला दोनदा नवीन गठ्ठा विकत घ्यावा लागला. बरेच जण त्याच्याकडून घेवून गाड्यांवर झेंडे लावत होते. यावेळी लोकं एवढे का खरेदी करत आहे समजत नव्हतं. न राहवून त्याने सिग्नल वरच्या टपरी वाल्याला विचारलं तेव्हा ' हर घर तिरंगा ' बद्दल समजलं. २ दिवस झाले आपण झेंडे विकतोय पण आपल्या घरावर आपण झेंडाच नाही लावला ही जाणीव झाली आणि तडक तो पुलाखालच्या आपल्या पत्र्याच्या घरात आला.

भारत माझा देश आहे

लेखक अनुस्वार यांनी सोमवार, 15/08/2022 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या घरात कुणी तिसराच राहायला येऊन "आता हे घर माझं आणि तुम्ही नोकर", असं म्हणाला तर तुम्ही काय कराल? काही आक्रमण करणाऱ्यावर हल्ला करतील, काही वाटाघाटी करतील आणि काही मलाही तसं सगळं सांभाळायला अवघड जात होतं असा विचार करून चक्क त्या त्रयस्थ माणसाची गुलामी स्वीकारतील. थोडं वरच्या पातळीवर जाऊ. त्या शेवटच्या माणसासारखा गावचा सरपंच वागला तर गावचा कारभार तिसऱ्याच माणसाच्या ताब्यात जाणार. आजपासून सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वी, इसवी सन १६०० साली असंच काहीसं घडलं.