(विद्यार्थीदशेतील भाचे मंडळींसाठी)
----
विद्यार्थीदशेतील एक टप्पा मागे सरून चढणीचा प्रवास सुरू होईल आता. धुकं असेलही प्रवासात आणि मनातही, पण ते थोडंसं निवळावं म्हणून हे चार शब्द.
----
आरोग्य, सवयी:
आरोग्य सर्वोपरी. या वयात हे ध्यानी-मनीही नसतं पण आरोग्याच्या चांगल्या सवयी आतापासूनच लावणं आवश्यक. नियमित सूर्यनमस्कार, ओंकार प्राणायाम अशा सोप्या, छोट्या गोष्टी खूप चांगला, सकारात्मक मानसिक परिणाम करतात, आत्मविश्वास द्विगुणित करतात. पण इथे महत्वाची असते ती नियमितता!
चांगल्या सवयी आत्मसात करणं कठीण आणि त्या जपणं महाकठीण!