भरु आज पेला ( गटारी स्पेशल)
मला ते विचारी भरु आज पेला
तसा मी म्हणालो कशाला कशाला
विजय कासवाचा पुन्हा का असावा
कशी झोप येते भिणा-या सशाला
तिला बोलण्याचे खरे टाळले मी
उगा दोष देतो रिकाम्या खिशाला
जरा दोन घटका चला घोट घेवू
किती चांदण्या या विचारु निशेला
जरासे पिल्याने कुठे काय होते
किती थंड वाटे बिचा-या घशाला
- किरण कुमार
काव्यरस
युट्युबर्सना किती पैसे मिळतात?
नमस्कार मिपाकरांनो,
नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या "नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||" आणि मिपाकर धर्मराजमुटके ह्यांच्या "काय बोलावं सुचेना !" ह्या दोन धाग्यांवर, युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडीओं पासून ते तयार करणाऱ्या क्रिएटर्सना/चॅनल्सना किती उत्पन्न मिळते ह्याबद्दल आलेले काही प्रतिसाद वाचल्यावर एका प्रतिसादाला उत्तर देण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला होता, पण विषयाची व्याप्ती थोडी मोठी आहे त्यामुळे थोडक्यात उत्तर देणे शक्य नसल्याने स्वतंत्र लेख
इलाज नसलेला फीव्हर
इलाज नसलेला फीव्हर
मी संध्याकाळचा चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात माझा फोन थरथरायला लागला. बघतो तर काय पुष्पा वहीनींचा फोन! बहुतेक गरम गरम कांदापोहे तयार आहेत. या खायला असा निरोप असणार किंवा रात्रीचे जेवण इकडेच करा, अस आग्रहाचे निमंत्रण असणार. म्हणून मी उत्साहाने फोन उचलला.
“हॅलो, वहिनी कांदा पोहे...”
मला पुढे बोलू न देता वहिनी बोलू लागल्या, “अहो बंड्या भावोजी, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या पाहू. तुमचे मित्र पहा कसं वेड्यासारखे करताहेत.
नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||
काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री.
अलक
अलक अर्थात अति लघुकथा
अलक 1
प्लॅन्चेटविषयी ऐकलं तेव्हा पासून करून बघण्याची इच्छा होती. पण भिती पण वाटायची. आज मात्र ठरवलं. अन्या आज घरी एकटाच होता त्यामुळे त्याच्याकडेच जमायचं ठरवलं. मी, विन्या, चारू,दिपू नि अन्या. अन्या त्यातल्या त्यात माहितगार. आम्ही काळोख करून मेणबत्ती पेटवली. त्या खाली अक्षरांचा बोर्ड आणि नाणं ठेवलं. सर्वानुमते एका माहितीच्या माणसाच्या आत्म्याला बोलावलं. पाच मिनिटं शांततेत गेली आणि नाणं थरथरलं. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. धीर करून अन्याने पहिला प्रश्न विचारला. मग भीड चेपली गेली नि सगळे बोलायला लागले. प्रश्न संपले नि मेणबत्ती पण संपली. सर्वांना एकदम भारी वाटत होतं.
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-१० } चायना ऑन अलर्ट
मला हा धागा प्रकाशित करताना फार अडचण येत आहे, कितीही प्रयत्न केला तरी धागा प्रसिद्ध करता येत नाही.
तेव्हा निदान या धाग्याच्या प्रतिसादात तरी काही लिहात येते का ते पाहतो.
रविवार आणि खून का बदला खून
आज रविवार..
आज कामाचा कंटाळा........... आलाय, आज तु स्वयंपाक बनव ना !
अगं कंटाळा आलाय तर नको करु स्वयंपाक. आज आपण बाहेर जेवायला जाऊया.
नक्को. रविवारी मंदिराबाहेर भिकार्यांची गर्दी असते त्यापेक्षा जास्त हॉटेलबाहेर टेबल रिकामं होण्याची वाट बघणार्यांची गर्दी असते.
मग आपण पार्सल मागवूया का ?
नक्को. पार्सल पण फार उशीरा येतं आणि ते पदार्थ पण थंड झालेले असतात.
मग काय करायचं ?
तुला जेवायचं असतं तेव्हा मी तुला हॉटेलचा पर्याय देते काय ? घरी जेवण बनवते ना ? मुझे खून का बदला खून से चाहिए |
हट पगली, ऑख के बदले ऑख मांगोगी तो पुरी दुनिया अंधी हो जायेगी !
ठिगळ
माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे गृहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, "आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही." हे ऐकुन मी थक्कच झालो. पण तरी खात्री करण्यासाठी परत विचारले की अहो, फूल ना फुलाची पाकळी समजून काही पाहिजे तर सांगा, तर मला म्हणाले "नाही, काही नको. ते आमचं प्रिन्सिपल आहे." :) नंतर १५ मिनिटात त्यांनी माझे काम केले.
अजून १ थोडासा वेगळा अनुभव. बऱ्याच वर्षांपूर्वी मी फ्लॅट विकला, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसात गेलो होतो.
मिसळपाव