बालपण...?
मला सुद्धा एकदा विडंबक व्हायचे आहे
अन एकदा तरी त्या 'जिलब्यांच'फडक फाडायच आहे..
कधीही न घाबरता ट ला ट अन म ला म प्रवृत्तीना
हलकेच घेत विडंबन पाडायच आहे..
विडंबकाचा खेळ तो खेळून पाहायचा आहे
खरच एकदा विडंबक होऊन,
सतत जिलब्या टाकणार्या
हलवायांचा पसारा आवरायचा आहे...
परीपक्वता विचारांत नसतेच बिलकुल
बालीशपणा मात्र वाढ्तच आहे
खरच एकदा विडंबक होउन
त्यांना अभ्यास वाढ्वायला लावायच आहे
कसलेसे उमासे अन कोणते ते उसासे
कचकचीत विड्म्बन टाकुन दाबायचे आहेत
अन पिंपळावरच्या भुतांना गाण्गापुरी धाडायचे आहे
खरच मलापण विडंबक व्हायच आहे...
मिसळपाव
