Skip to main content

नभांगण...!!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 15/03/2012 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुरावटींनी सजलेल्या, तर कधी उधळल्या गेलेल्या मैफिली.... घमघमलेली सांजरात अन् अर्धोन्मिलीत मोगरा.... 'आठवतंय का ते?'- सालांनंतरच्या भेटीतला, तुझा निरागस प्रश्न तेच, विस्मयी डोळे न् दुमडलेले ओठ! तुला विचारायचेच राहून गेले कधी वाकून पाहिलंस मनात माझ्या...? तू नेहमीच काठाशी वावरणारी..... 'अपनी धुन में मस्त' असं अधोरेखित जगणारी... जितकं तुला ओढू पाहिलं, अडकवु पाहिलं, तितकी निसटत गेलेली... 'बांधील प्रेमाचा व्यापार का?' ह्याच भोवती धुमसणारी समजलो नव्हतो, बंधनात अडकणारी तू नाहीस, जितकं स्वातंत्र्य नात्यात, तितकी माझी होशील ते! उमजताच, आलो हाक मारायला तोवर मनाचं नभांगण रिकामं करून गेलीस.... हाक

ज्योतिष- पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे झूटाही सही!

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 15/03/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषाची उपयुक्तता तपासा या म.टा.मधील राजीव उपाध्येंच्या लेखावर खर तर प्रतिक्रिया मला द्यायची नव्हती. तेच तेच मुद्दे किती काळ देत राहणार. पण म्हटल त्या निमित्त पुर्वप्रकाशित लेखनाचा काही भाग वाचकांच्या समोर आणावा.ज्योतिषावरचे वाद- प्रतिवाद हे गेली दीडशे वर्ष त्याच त्याच प्रकारचे आहेत.असो लेखातील काही मुद्यांचा परामर्श घेउ. "हे धैर्य वैफल्यग्रस्त व्यक्तिने नक्की कुठून गोळा करायला हवे होते? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठेल्यावरुन की नारळीकरांच्या आयुकातुन?

जगणे असेच का असते?

लेखक निश यांनी गुरुवार, 15/03/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे असेच का असते? जगता जगता मरायचे असते. जगण्याकरिता लढणे असेच का असते? लढता लढता हरायचे असते. जगण्यातले सुख असेच का असते? सुखाचि वाट बघता बघता दु:ख भोगायचे असते. जगण्यातली आशा अशीच का असते? आशेवर जगताना निराश व्हायचे असते. जगणे हे स्वप्नासारखे का असते ? सत्यात येता येता मोडुन ते पडते. खरच जगण हे एक कोड असते. ऊत्तर सापडल अस वाटत असताना नव कोड देउन ते शोधण्यात संपायचे असते.

जोवरी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 15/03/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
सागराच्या तळाशी किती रत्नराशी जगाच्या नकाशाशी झुंझतो शशी मानवाची स्थिती वादळे संगती मरणबाजार अवघा लढे पावसाशी जात जातीत भेदे कुणी क्षूद्र वंशी कळे ना कसे तो तयाचाच अंशी बिचारे विचारांचे क्षेत्र कोरडे स्नेह जाळून आळवे ती प्रार्थना कशी यातना ही खरी अंत तो तूच आहे पसारा दिगंत खंत पामरास दाहे जगावे उरावे जिणे तोषवावे जपावे झरे जोवरी श्वास वाहे ............................अज्ञात

महासंपन्न महाराज्ञी!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 15/03/2012 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
देशातील अब्जावधी गरीबांच्या सेवेचे कंकण हाती बांधून देशाकरता सर्वस्व त्याग केलेल्या आपल्या परमलाडक्या महाराज्ञी सोनियांची संपत्ती फक्त पंचेचाळीस हजार कोटी रुपये इतकी असल्याचे वृत्त एका अमेरिकन संकेतस्थळावर आले आहे. जगातील अतीश्रीमंत लोकांत महाराज्ञी चौथ्या क्रमांकावर आहेत हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. ह्या क्रमवारीत लवकरच त्यांचा क्रमांक आणखी वरती सरको अशी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12258052.cms

आज कुणी का राम व्हावे

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 14/03/2012 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ|| मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१| शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२| - संध्या
काव्यरस

अ‍ॅप्रिकॉट केक

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 14/03/2012 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या त्सेंटा आजीची लहान बहिण फॅनीआजी हिची आवडती रेसिपी - साहित्य- २५० ग्राम मैदा, १७५ ग्राम बटर, अर्धा कप साखर, १ चमचा बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ ५०० ग्राम अ‍ॅप्रिकॉट्स, एक चहाचा चमचाभर दालचिनी पावडर कृती- मैदा,बटर ,साखर, बेकिंगपावडर व मीठ सर्व एकत्र करणे व चांगले मळणे.हा गोळा प्लास्टीकमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये १५-२० मिनिटे ठेवणे. टिन्ड अ‍ॅप्रिकॉट्स असतील तर चाळणीवर घालून पाक निथळू देणे.