लावुन काळा चष्मा, करतो माझ्यापुरता ताप कमी,
उतरवुनी अन् विमा, उद्याची मनात मी मानतो हमी ।
सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे
मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'?
चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती
(मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती !