Skip to main content

वरदान

लेखक अमृत यांनी गुरुवार, 22/03/2012 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्यावेळी घरी गेलो तेव्हा लहान भावाला मोबाईलवर मित्रांशी संवाद साधताना बघून खूप खूप आनंद झाला. तोपर्यंत मित्रांना केवळ एसएमएस करूनच समाधान मानवं लागण्यामूळे खट्टू होणारा तो आणि आता ३जी च्या माध्यमातून मित्रांशी गप्पा मारणारा, तो हाच काय यावर सांगून सुद्धा विश्वास बसला नसता. आधीच मर्यादीत शब्दसाठा त्यातच भाषेचे पूर्ण ज्ञान नसल्याने होणार्‍या चूका यामूळे कित्तेक वेळातर मलासूद्धा त्याचे मॅसेजेस कळत नसत. मग तो काय सांगायचा प्रयत्न करतो आहे हे आशयावरून समजावे लागे. आई-बाबांशी मी फोनवर बोलताना तो तीथे उभा राही व केवळ चेहर्‍याच्या हावभावांवरून काय बोलणं सुरू आहे याचा अंदाज लावी.

ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

लेखक यकु यांनी गुरुवार, 22/03/2012 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे. आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत - ''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.

शाईचा पेन व पेनचे निब

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 22/03/2012 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सुधांशू यांचा शाईचा पेन हा लेख वाचला व काही आठवणी जाग्या झाल्या त्या शब्दांकित करीत आहे. ९२-९३ सालातील गोष्ट आहे .नुकतेच मुक्त धोरण सुरू झाले होते.नव नवीन प्रोजेक्ट्स भारतात येत होते आम्ही त्या सुमारास रेव्हेलोन पेन कंपनीचे काम करत असू.दादर ला भवानी शंकर रोड वर तो कारखाना होता/आहे. ति कंपनी बॉल पेन्स तयार करीत असे. बॉल पेन्स चे रिफिल्स च्या ज्या टिप्स असतात.

म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ.

लेखक कौन्तेय यांनी गुरुवार, 22/03/2012 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं.

जलतज्ञ माधव आत्माराम चितळे

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 22/03/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.

आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

काहीतरी विधायक करावं !! भाग १

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 21/03/2012 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रस्तावना : १. ही कोणतीही जाहीरात नाही. २. ह्यात कोणताही स्वार्थ नाही. ३. कोणतेही साहित्यमुल्य/सेटल द स्कोर नाही. ४. गैरसमज नकोत. ;) धन्यवाद. खरं तर मराठी आंजावरून तात्पुरता सन्यास घ्यायचं ठरवलं होतं, पण पुन्हा एकदा उफाळून आलंच. वांझोटे धागे, चर्चा, जुलाब लावणार्‍या कविता, मराठी माणूस आहोत हे सिद्ध करणारे चरणखेचक धागे आणि रिकामचोट शतकी प्रतिसाद.. ( अर्थात यात माझाही सहभाग असेलही) पण यातून खरच काय साध्य करतोय असा विचार मनात आला. असो, मूळ मुद्द्यावर येऊया, मी मिपावर आलो ते "राघव - पुर्वीचा मुमुक्षु" या व्यक्तीमुळे.

धुक्यात हरवली मुंबई

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 21/03/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी दिडच्या सुमारास जेवायला भोजनकक्षात गेलो असता सर्वत्र दाट धुके दिसले. माझी कचेरी कालिना -बीकेसी भागात आहे. आमच्या इमारतीच्या मागच्या बाजुने पश्चिम द्रुतगती मार्ग सरळ रेषेत जेमतेम १ किमी असेल. मात्र तो दिसेनासा झाला होता. सी लिंक वा वरळीच्या इमारती दिसणे तर दूरच. हे धुके कसे काय? सकाळी येताना स्वच्छ प्रकास होता. आता गारवा संपला असून रखरखाट सुरू झाला आहे. मग हे धुके कसले? प्रदुषण तर नेहेमीचेच आहे. आणि धुर थिजुन धुके व्हायला थंडी तर हवी?

पंढरपुर ला पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ?

लेखक निश यांनी बुधवार, 21/03/2012 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अलीकडे माझे पंढरपूरला जाणे झाले. तिथे पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ? दोघांचाही मुर्ति एकत्र नाहि आहेत. ह्या बद्दल नक्की काय कथा आहेत? आणी आषाढी व कार्तिकीला त्या एकत्र आणुन पुजा करतात ह्या मागे काय कथा आहेत? अजुन एका श्लोका मध्ये पांडुरंगाचा उल्लेख रकुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा असा उल्लेख आहे. राई म्हणुन जो उल्लेख आहे तो पांडुरंगाच्या पत्निचा असावा का ?