लोकशाही, नोकरशहा आणि प्रशासन
लोकशाही, नोकरशहा आणि प्रशासन
'सरकारी काम आणि सहा महिने थांब' याचा अनुभव जवळजवळ सगळ्यांनाच आला आहे. त्यामुळे सरकारी लालफितीच्या कामाविषयी जनसामान्यात कमालीची चीड आहे. ही कामे करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. प्रशासनात असणारा नोकरशाहा या कामांचा निपटारा करीत असतो. पण निव्वळ नंदीबैलासारखा वागणारा हा नोकरशहा फक्त वरचा आदेश पाळतो आणि त्यानुसार कामे करत असतो. वरून आलेल्या परिपत्रकाची आहे तशी अंमलबजावणी करून आपले कर्तव्य पार पाडत राहतो. नियमांवर बोट ठेवत स्वतःचा खिशा गरम करून घेण्यात आणि वेळकाढूपणा करण्यात पटाईत असलेल्या नोकरशहाला जनतेला किती आणि कसा त्रास झाला, याची अजिबात फिकीर नसते.
मिसळपाव