लेखकअज्ञातकुलयांनी शनिवार, 18/02/2012 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशीचे मन कोरे निरभ्र होते
चांदणे सुखावत होते रज कैफाने
झाडाआडुन मी होतो वेधत खेळ ऐहिकाचा
पाऊल टाकले क्षितिजावर चंद्राने
ती भोर सावळ्या चतुर्दशीची होती
डौलात ठाकली कोर; पोर सगुणा जणु होती
पाहून ऐट चुकले ठोके हृदयाचे
एव्हाना ती आरूढ काळजावरती झाली होती
आभास नव्हे; हा श्वास खास जगण्याचा
ही साद अशी की अंतर्नाद सणाचा
अचरासह चर ऐशा किमयेचा शेला
मी साक्ष एक; प्रेरीत नित्य; ह्या नव्या युगाचा
........................अज्ञात
लेखकइष्टुर फाकडायांनी शनिवार, 18/02/2012 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
माहित नाही जे लिहितोय ते पूर्ण करू शकेन का नाही.. कारण ज्याचा निर्धार करून लिहावं लागतं त्याच्या शेवटाची खात्री नसते असा माझा अनुभव आहे. शिवाय हि गोष्ट सुमारे मी सातवीत असल्यापासूनची; म्हणजेच आजपासून पंधरा वर्षांपेक्षा जास्तच जुनी. मी आमच्या गावाच्या 'पूर्ण प्राथमिक' शाळेत शिकत असतानाची. काकाने पुण्यात पहिला ब्लॉक घेतला होता तेव्हा. नवी सोसायटी, नवी कपल्स, नवीनच पिल्लं सगळे असे मस्त कोवळे. त्यात 'पुण्याचं' आकर्षण, तिथल्या पोरांचं, पोरींचं दिसणं आणि असणं सगळंच छान, जवळ ओढून घेणारं. आणि त्यात गुलाबी वय; नुकतीच सोनेरी फुटायला लागली होती, असं.
लेखकमनोज श्रीनिवास जोशीयांनी शुक्रवार, 17/02/2012 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अने़क मित्राना शास्त्रीय संगीता मध्ये रूची नाही असे नाही , पण मुद्दाम म्हणून ऐकत नाहीत. ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे अनेक गायक -गायिका ख्याल गाताना शब्द / बोल व त्यामधील "भाव" ह्या कडे पूर्ण दुर्लक्ष करतात. त्या अर्थाने ही स्वरप्रधान गायकीच आहे. त्यामुळे स्वरांची तोंड ओळख सुद्धा नसलेल्या सामान्य श्रोत्याला ह्या संगीतामध्ये रूची निर्माण होत नाही. ह्या वर ऊपाय म्हणून ऊपशास्रीय संगीत ( नाट्य संगीत / ठुमरी / दादरा ) ऐकावे. थोड्या दिवसात मध्ये अपोआप गोडी निर्माण होईल. मिपा वर जर कोणी शा.
लेखकचैतन्य गौरान्गप्रभुयांनी शुक्रवार, 17/02/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
वाळू!
केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण!
लेखकशशिकांत ओकयांनी शुक्रवार, 17/02/2012 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो,
विवेक खोतांनी करणी / भानामती असा धागा काढून त्यांना आलेला विलक्षण अनुभव सादर केला. त्यानंतर अनेकांनी आपापल्या अनुभवांची त्यात भर घातली. त्यावर नेहमीप्रमाणे उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यात गविंनी त्यांना सुचवले, “आपण करणी वा भानामती खरी असते असे न बिचकता खणखणीतपणे म्हणा व त्यावर चर्चा करायला टाका”. आत्मशून्यांनी म्हटले, “भानामती /करणीचा तर स्वतःला मला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात”.
लेखकराजघराणंयांनी शुक्रवार, 17/02/2012 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
महापालिका निवडणुकीत भरपूर मनोरंजन झाले. ठाकरेंची कोंबडी पवारांना भावली पण त्यांच्या कोंबड्यात दम नसल्याने, कोंबडीने अंड घातलच नाही ! राज उद्धव पाउल फुडे मागे जायचे खेळ खेळत होते. बाबा म्हणाले ठाकरेंचे महत्व ही निवडणुक संपवणार.
काही मनोरंजक उखाळ्या पाखाळ्यांचा संग्रह करूया इथे
काय बघतोस रागाने फाडुन खाल्ल ना वाघाने..."
बघतोयस का रागान इंजिन धावतय वेगान
तुम्ही अॅड करा अजून
-
लेखकपारायांनी शुक्रवार, 17/02/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा म्हणजे संपादकांना एक प्रश्न म्हणा किंवा एक नवीन feature म्हणा.
माझ्या मनात असे होते कि मिसळपावचं एक twitter खाते बनवता येईल काय ?
नवीन कुठलेही लेखन झाले की आपसूक एक tweet केला जाईल ज्यात त्या लेखाचा दुवा असेल.
कशी वाटते कल्पना?
ता. क. : असे आधीच काही असेल किंवा असा काही विचार आधी झाला असेल तर माफ करा
अ.(अधिक) ता. क. : कुठल्या विषयांतर्गत हे मांडावे न कळल्यामुळे बरेच विषय निवडले आहेत
लेखकहुप्प्यायांनी शुक्रवार, 17/02/2012 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्च नेत्या आपण इटलीहून आयात केल्या. तर नुकतेच आलेल्या बातमीनुसार ह्या थोरल्या महाराणीसरकारच्या म्हाईरच्या काही लोकांनी भार्ताच्या काही मच्छीमार बांधवांचा गोळ्या घालून बळी घेतला. कारण की ते चाच्यांसारखे दिसत होते (म्हंजी चाचा न्हेरू वा थत्ते चाचा नसून सोमालियातील चाचे).
http://timesofindia.indiatimes.com/india/Killing-of-fishermen-Italian-n…
महाराणीसाहेबांनी वज्रचुडेमुंडित असल्यापासून ती.गं.भा.