आंदोलन आणि फलित
आज काही कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली.
आज अण्णा हजारे उपोषणस्थळी उपस्थित नव्हते. तुरळक गर्दी होती सुमारे दोन हजार लोकांची. मंचावरून बहुधा मनिष सिसोदिया यांचे भाषण चालू होते.
मिसळपाव
महाभारताच्या युद्धात १६ वर्षीय अर्जुनपुत्र अभिमन्यू याने कौरवांच्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन, कर्ण, जयद्रथ इत्यादी कौरवांच्या महारथींना तोंड देत तरुण वयात एवढा मोठा पराक्रम केल्यामुळे भारताच्या इतिहासात अभिमन्यू अजरामर झाला. अधर्माच्या विरोधात धर्माने दिलेल्या या लढाईत धर्मासाठी अनेक रथी-महारथींनी पराक्रम केला. त्यांच्या पराक्रमामुळेच धर्माचा जय झाला.
कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा केवळ ७ अक्षौहिणी पांडव सेनेकडून पराभव झाला.