Skip to main content

अंत नको पाहु!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 25/11/2011 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
सचिनचे शंभरावे शतक पुन्हा हुकले! हा सद् गृहस्थ आणखी किती वाट पाहायला लावणार आहे? क्रिकेटमधल्या या चमत्कारावर अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे हे खरे, पण ते त्याच्या कर्तृत्वरील विश्वासामुळेच आहे. शंभर शतके त्यानी नाही करायची तर कोणी? असो. आता वाट पाहायची आणि आशा बाळगायची.

मदत हवी आहे......

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 24/11/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
खाकरा (मेथी खाकरा, पावभाजी खाकरा, अजुन काय काय प्रकार असतात ) कसा बनवायचा... त्याची रेसिपी सांगाल काय???

थप्पड-शरद पवारांना की मुजोर झालेल्या लोकशाहीला?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 24/11/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण आज दुपारी १ते२ च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. दिल्लीमधे मा.शरद पवार एका कार्यक्रमाहुन निघत असताना,एका तरुणाने (हरविंदरसींग) पवारांच्या दिशेनी चाल करत ''ये सब चोर है'' अशा आशयाची काही वाक्य उच्चारत पवारांना एक थप्पड लगावली.तो तरुण महागाइच्या कारणावरुन भडकुन तस वागला असं अता व्रुत्तवाहीनीवाले सगळेच सांगत आहेत. तो मनोरुग्ण आहे हेही याच व्रुत्तांतात ऐकायला मिळत आहे.अजुन आज रात्री/उद्या पर्वापर्यंत याचे अजुनही वेगवेगळे 'अर्थ' आपल्यासमोर येतिल.

कट्टा - मुंबई २८ ते पुणे १३.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 24/11/2011 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर भेटणा-या आयडिंच्या मागचे चेहरे कसे असतात, ती बोटं कशी असतात जी आपल्या डोक्याला शॉट लावणारे प्रतिसाद लिहितात अन नंतर ह.घ्या असं लिहुन खरड टाकतात. आपल्या सगळ्यांना बरंच आकर्षण असेल, कोण असतात ती माणसं जी आपलं सुंदर अप्रतिम असं कौतुक करतात, प्रत्यक्ष भेटल्यावर सुद्धा ती आपल्याला त्याच अन तशाच शिव्या देतील का त्यांच्या चेह-यावर फक्त प्रकाटाआ लिहिलेलं दिसेल.

पुण्यातील टेकड्यांवर घाला!

लेखक ए.चंद्रशेखर यांनी गुरुवार, 24/11/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षात सत्ता व संपत्ती यांच्या अमर्याद प्राप्तीमुळे आपला वैयक्तिक लाभ हा एकमेव हेतू असलेला एक नवीन वर्ग महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. या वर्गाला अमूक राजकीय पक्षाचा, तमूक राजकीय पक्षाचा या प्रकाराने केलेली वर्गवारी मुळी लागूच पडत नाही. ही मंडळी कोणत्याही राजकीय पक्षाची असोत नाहीतर कोणत्याही क्षेत्रात असोत. मग ते शिक्षण क्षेत्र असेल किंवा समाज सेवेचे क्षेत्र असेल. या मंडळींचे लक्ष फक्त कोणत्याही गोष्टीतून आपला वैयक्तिक लाभ कसा करून घेता येईल याकडे फक्त असते.