स्वप्नांचा मागोवा
स्वप्नांचा मागोवा घेत
मी निघालोय प्रवासाला
ती सत्यात उतरवण्यासाठी.
.. मोठं व्हायचंय मला
अंधारावर मात करता येईल
विचार आहेत डोक्यात
बघू या, काय होतंय
छोटासाच कंदील हातात
योजने योजने दुरचा प्रवास
दोनच पावलं दिसतात
पण, ती पुढे टाकली कि
रस्ता येतो आवाक्यात
जवळची पुंजी थोडी
त्यावरही करीन मात
कष्ट करुन अजून मिळवीन
आहे तेवढी ताकद मनगटात
फिरताना जगाच्या बाजारात
अनुभव खूप मिळेल
काय चालते, चालंत नाही
जागेवरतीच कळेल
फुकटाच्या घबाडाचं
मला काय पडलंय
अनुभवाच्या शिदोरीतच
माझं नशीब दडलंय
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
