नजर
आज निजूनि उठलो
अन जाणवले स्पष्ट दिसत नाही
जवळचेच दिसते आहे फक्त
नि लांब चे कळतच नाही
जवळच ठेवलेली वही, पेन, घड्याळ
वर्तमान पत्र आजचे
सर्व काही दिसते आहे, पण
उद्याचा अंक काही दिसत नाही!
नेमके काय घडले आहे
कळंत नाहि मज
सकुंचित नजर झाली माझी
कि आकुंचल्या जवळील गोष्टी!!
मिसळपाव