ज्यादा आकाराचे पोस्ट कसे करावेत?
नमस्कार मंडळी.
मी गेल्या काही दिवसांपासून "करण आणि फ्रेण्ड्स" ही कथा जनातलं मनातलं मध्ये पोस्ट करतोय. जेव्हा मी सुरूवातीला पोस्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा मी ह्याचे "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात मांडणी केली होती. पण नंतर कळले की मिपावर एक पोस्ट साठवताना काही शब्दमर्यादेपुढे सर्व्हर एरर देतो. वास्तविक ही सूचना "नवे ले़खन" पोस्ट करतानाच्या एडिटर वरच असायला हवी होती. कारण मिपाच्या एडिटरममध्ये तर सुरूवातीस माझी संपूर्ण कथा सुद्धा समावली होती. त्यामुळे मला वाटते की एका पोस्ट मध्ये कुठल्याही आकाराची कथा जाईल. पण तसे नाही आहे.
मिसळपाव