सोन्याचे भाव
मा. मि.पा. हा खरोखरच विचार करण्या सारखी गोष्ट आहे ती म्हणजे कॉमोडीटी मार्केट मुळ मध्यम वर्गातील लोंक थोड्या पैशात एक किली सोने कागदावर खरेदि कारण्याचा विचार करत आहे. पण खरच सोने २४ ते २५ हजार रुपये तोळे होऊशकते काय? ह्याचा गंभीर पणे विचार करण्यास हवा? तु घेतले म्हणुन मी सुद्धा घेतले म्हाणून आज सोन्याला हा उंचाक मिळाला आहे. पण परिस्थिती नुसार कॉमोडीटी मार्केट मधुन खरे गुंतवणुकदार केव्हाच निघुन गेले आहेत फक्त उरला आहे तो मध्यम वर्ग.
मिसळपाव
आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.