Skip to main content

'विचित्रगड' किल्ले रोहिडा

लेखक चक्कर_बंडा यांनी शुक्रवार, 24/06/2022 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
२६ मार्च २०२२ #रोहिडा #विचित्रगड #भोर #vichitragad #rohida #bhor उन्हाळ्याची जोरदार फलंदाजी एव्हाना सुरू झाली असल्याने आता अवघड किल्ल्यांना भिडणं आमच्यासारख्या सर्वसाधारण वकुबाच्या हायकर्ससाठी तितकंसं सहजसाध्य राहिलेलं नव्हतं, त्यामुळं, फेब्रुवारीतील राजगड मोहिमेआधीपासूनचं यादीत आणि चर्चेतही असलेला 'विचित्रगड' तथा "किल्ले रोहिडा" या तशा मध्यम-काठिण्य श्रेणीत मोडणाऱ्या पण अतिशय सुंदर अशा किल्ल्यावर स्वारीचा मुहुर्त ठरला, शनिवार, २६ मार्च २०२२ व त्यानुसार तयारी झाली. एकूण ६ मावळे या मोहिमेत सामील होणार होते.

मीर जाफरची आठवण

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 24/06/2022 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला.

दिनेश कार्तिकची फिनिक्स भरारी...

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 23/06/2022 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स हा काल्पनिक पक्षी असला तरी त्याच्याप्रमाणे राखेतून नवी भरारी घेणारे काही लोक प्रत्यक्षात असतात. दिनेश कार्तिक हा क्रिकेट जगतातील नवा फिनिक्स आहे. १ डिसेंबर २००६… जोहान्सबर्गमध्ये भारत विरुद्व दक्षिण आफ्रिका टी-२० सामना सुरु होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील भारताचा पहिला टी-२० सामना होता. सचिन, सेहवाग, झहीर, आगरकर, हरभजन असे खेळाडू त्या संघात होते. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले. चांगली सुरवात मिळूनही मधल्या षटकांत भारताचा डाव ढासळला. दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी करून भारताला तो सामना जिंकवून दिला.

बंडवीर

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 23/06/2022 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
।। उध्दवाते ना धरवे धीर ।। ।।सेने त उभे बंडवीर ।। ।। गेली ही सत्तेची खीर ।। ।।हातातून।। ।। बदलली नाही पार्टी ।। ।। बदल फक्त रिसाॅर्टी ।। ।। अजून कलटी मारती ।। ।। एकएक ।। ।।राहीले पंधरा जेमतेम ।। ।।नंबरचा हा सर्व गेम ।। ।। कुणाचा धरावा नेम ।। ।।नाॅट रिचेबल ।। ।।गनीमीने करता वार ।। ।।कोण नवा हा सूत्रधार ।। ।।विठ्ठला महापूजा करणार।। ।।कोण आता?।।
काव्यरस

पंचायत - २

लेखक साहना यांनी मंगळवार, 21/06/2022 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : पंचायत सीजन १ पहिला नसल्यास पुढे वाचू नये. सीजन दोन चे रसभंग इथे नाही दिले आहेत. त्यामुळे तो पहिला नसल्यास सुद्धा तुम्ही वाचू शकता. गावच्या गजाली म्हणून मी एक लेखमाला इथे लिहिली होती. ग्रामीण भागांतील सर्वसाधारण जीवन आणि त्यातील सध्या सध्या गोष्टींतील मनोरंजन हि त्याची पार्शवभूमी होती. ऍमेझॉन च्या पंचायत ह्या सिरीज चे कथानक सुद्धा तेच आहे. त्यामुळे मला ती आवडणे अतिशय अपेक्षित होते. पण सर्वानाच हि सिरीज अत्यंत आवडली आहे. ह्या सिरीज मध्ये काहीही वॊक पणा नाही. नेहमीच्या बॉलिवूड मध्ये जसे तोंडी लावायला सेक्युलॅरिसम किंवा इतर काही अजेंडे नाचवले जातायत तसले काहीही नाही.

कोंडून घेण्याचा जपानी प्रकार

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 21/06/2022 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यात अग्रेसर असलेले राष्ट्र म्हणून जपानला आपण ओळखतो. प्रचंड मेहनत, वक्तशीरपणा आणि काटेकोर शिस्त हे तिथल्या नागरिकांचे गुण कौतुकास्पद आहेत. दुसऱ्या बाजूस तिथल्या औद्योगिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेले ताणतणाव हेही प्रचंड आहेत. त्यातूनच निरनिराळ्या मानसिक समस्यांचे प्रमाण तिथे खूप आहे. या लेखात अशाच एका मानसिक समस्येचा आढावा घेत आहे. 1970 ते 80 च्या दशकात जपानमधील पौगंडावस्थेतील मुले आणि तरुण यांच्यात एका मनोवृत्तीची लागण होऊ लागली. ही मुले शाळा-कॉलेजला विनाकारण वारंवार दांड्या मारू लागली आणि स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागली.