मुंबई लोकल मधील खरेदी
सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते.

बहारो फूल बरसाओ - २
या बँडवाल्याची एक गम्मत असते. त्यांचे पोशाख एकदम मस्त असतात . लालजर्द कोट त्यावर सोनेरी दोरीची नक्षी. सोनेरी बटणे. डोक्यावर पी कॅप. ती फरची असती ना उंच तर एकदम कोणीतरी बकिंगहॅम पॅलेसचे गार्डच शोभले असते. पण जरा नजर खाली करा. इतक्या सुंदर कोटच्या खाली पायजमा आणि पायात स्लीपर असतात. कुठल्याही लग्नात वाजणार्या बँडवाल्याना पहा थोड्या फारफरकाने हेच दिसते.
मागील दुवा http://misalpav.com/node/50337
मी कार्यालयाच्या दारात उभी आहे. मायाच्या आईने माझ्यावर दिलेली जबाबदारी म्हणजे येणार्या पाहुण्याना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करणे, सांभाळतेय. मजा येते.
मिसळपाव