लेखकपान्डू हवालदारयांनी गुरुवार, 18/08/2011 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिशकालीन भारत के झेलम जिले (अब पाकिस्तान में) 18 अगस्त, 1936 को एक सिख परिवार में जन्मे गुलज़ार लेखक और कवि बनने से पहले दिल्ली में एक कार मैकेनिक हुआ करते थे...
गुलझार ह्याना वाढदिवसाच्या शुभेच्या...
लेखकनिनावयांनी गुरुवार, 18/08/2011 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
झिजलेल्या काठची माती गिळून
विस्तारणारे तळे
ऊंच लाटांमधल्या रागाचे
सुटणारे संयमाचे कडे
पाउस न पडताच
मातीतली दडपण
पाउलवाटे वरची
विचारांची वण्-वण!
पानगळीतल्या गीतात
नव्या पालवी चे स्वर
न बदळणार्या रीतीं वर
बदळणारे अगणित मत!
ओळखीचे भाव अनोळखी चेहर्यांवर
भिंत्यांवरची ओल उतरते हळुच फरशी वर
खिडक्यांवर डोकावते सुंदर पानांची वेल
नव्-आकृतीत जागा शोधण्याचे खेळ!
परिस्थिती? कि मात्र एक क्षण?
अभिव्यक्ति? कि मात्र एक अनुभव?
खेळ? योगा-योग? कि भाग्यच हे?
बहुतेक, नकळत मनावर उठणारे वण!
लेखकआत्मशून्ययांनी गुरुवार, 18/08/2011 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अल्केमि (किमयागीरी), हे एक शास्त्र आहे पदार्थ तयार करण्याचं, रचण्याचं. आणी तो मोडून पून्हा त्यातून काहितरी दूसरा नवीन पदार्थ निर्माण करण्याचं. म्हणूनच हे लोखंडापासून सोनं निर्माण करू शकत... पण हे एक शास्त्र असल्याने एका मूलभूत सिध्दांताला बाधील आहे आणी तो म्हणजे एखादी गोश्ट तयार करण्यासाठी तीतकेच समान मूल्य असलेली दूसरी गोश्ट गमावणे अत्यावश्यक आहे....
गावाबाहेरच्या टेकडीवर उभ्या असलेला माझ्या छोटेखानी परंतू दगडी गढीबद्दल लोकांना कधि फारसे आकर्षण न्हवतेच. मी मूद्दामच ती गढी गावापासून दूर अशा ठीकाणी राहता येण्यासाठी निवडली होती.
लेखकइंटरनेटस्नेहीयांनी गुरुवार, 18/08/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
(डिसक्लेमर: सदर कथा ही संपुर्णतः काल्पनिक कथा आहे. कथेतील कोणत्याही घटनेचा, ठिकाणचा, संस्थेचा, जिवंत अथवा मृत पात्राचा, वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
मुंबईतलं एक अग्रगण्य महाविद्यालय.. डी. जी. रुपारेल कॉलेज. दिवस १० ऑगस्ट २००७ वेळ दुपारची.. पाउस रिमझिमत होता आणि वातावरणाला एक प्रकारचा 'रोमांचित साज' चढला होता.. आणि कॉलेजचे कॅम्पस विविधरंगी 'फुलांच्या' ताटव्यांनी बहरून गेले होते.. इकडे आत 'मेन बिल्डींग' मध्ये धावपळ सुरु होती.. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याची गडबड घाई .. १२ वी पर्यंत कॉलेजचा अनुभव घेतला असला तरी ११ वी १२ वी म्हणजे एकप्रकारे शाळाच..
लेखकसुधीर काळेयांनी गुरुवार, 18/08/2011 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता माझी नाहीं पण प्रत्येकाने वाचावी अशी आहे. मिपाच्या कायद्यात बसत नाहीं. म्हणून संपादकांना असे करणे रुचले नाहीं तर अवश्य उडवावी!
सुधीर काळे
सुनीला गोंधळेकर यांची ही अप्रतिम कविता प्रत्येकाने वाचायलाच हवी!आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय?
यांना तुरुंगात घालायचं नाय, यांना बाहेर ठेवायचं नाय
यांना बोलू द्यायचं नाय, मग गप्प करायचं काय?
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II१II
जमली अवघड प्रश्नांची साय, खाली उकळत दुध हाय
तोंड भाजून घ्यायचं का काय, जीभ दातात अडकली हाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय?
लेखकगंगाधर मुटेयांनी गुरुवार, 18/08/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
वादळाची जात अण्णा
माणसे खंबीरतेने, टाकतेया कात अण्णा
इंडियाला भावला हा, एक झंझावात अण्णा
धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला?
भ्रष्ट नेते मोकळे अन, कोठडीच्या आत अण्णा
भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा
एक आशेचा
लेखकअभिजीत राजवाडेयांनी गुरुवार, 18/08/2011 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझी कविता माझ्या आवाजात....मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ते?
पुरुष हवे आहेत...
या देशाला हवे आहेत पुरुष,
मानसिक पुरुषत्व असलेले पुरुष,
शारिरीक पुरुषत्व असुनही मानसिक शंढत्व
असलेल्या पुरुषांच्या या काळ्या ढगात,
वीजेसारखे आसमंत उजळवणारे पुरुष,
निराशा अन निशेला आपल्या बलदंड खांद्यांनी,
स्मशानात पोहचवणारे पुरुष
समरांगणात मारिता मारिता,
तलवार वाकवणारे पुरुष
सहानुभुतीवर थुंकणारे पुरुष,
वादळांना फुंकणारे पुरुष,
शुन्यातुन स्वर्ग निर्माण करणारे पुरुष,
राष्ट्रासाठी हसत हसत म