Skip to main content

दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !

लेखक विदेश यांनी बुधवार, 11/05/2011 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : शूर आम्ही सरदार आम्हाला ) दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती ! लाज-बीज अन् शरमहि नाही , प्याले घेतले हाती |धृ| मस्तीच्या दर्पात उधळली, उच्च कुलाची रीत दोस्तीशी ईमान राखलं , घडलं जरि ईपरीत लाख झेंगटं झेलुन घेईल , अशी झिंग ती राती |१| धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच आम्हाला ठावं सोसायटीमध्ये कसं जगावं , हे न आम्हाला ठावं आईबाबांची सारी अब्रू - टांगू वेशीवरती |२| ( सूज्ञांस संदर्भ वे. सां. न. ! )
काव्यरस

मिपा चा सर्वर

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 11/05/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपाचा सर्वर खुपच गंडला आहे. मिपा हळु चालतेय की गोगलगाय यावर सध्या जोरात चर्चा आणि अभ्यास चालु आहे. धागे टंकायला घेतले की ते प्रकाशित होतीलच याची काही खात्री नसते (हे "मै सुबह घर से निकलता हू तो शाम को घर पहुचांगा की नही मुझे मालूम नही होता" या धर्तीवर वाचावे). सकाळी मिपाचा पहिला धागा उघडताना किमान ४ वेळा रिफ्रेश करावे लागते. मिपाबद्दल किंवा व्यवस्थापनाबद्दल मला अजिबात तक्रार नाही कारण विनामोबदला, पदरचे पैसे खर्च करुन, संकेतस्थळ उत्पन्नाचा स्त्रोत म्हणुन न वापरता, संकेतस्थळ चालवणे अवघडच नाही तर अशक्य आहे. अश्या परिस्थितीत याहुन चांगल्या सुविधा देता येतील असे वाटत नाही.

रस्त्यावरचे सस्ते बालगंधर्व...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 11/05/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालपरवाच जालावर खालील फोटो पाहायला मिळाला आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. एच एम व्ही च्या याच मालिकेतली एक फिरती संगीत थाळी (Record) माझ्याकडे आहे त्याची आठवण झाली. मुंबैचा चोरबाजार. म्हणजे गोल देउ़ळ, भेंडीबाजारचा भाग. या चोरबाजाराबद्दल पुन्हा केव्हातरी सवडीने आणि डिट्टेलमध्ये. इथे काय काय मिळू शकतं, त्याचे भाव काय असतात, भावाची घासाघीस कशी चालते, अवचित गुंडगिरी-दादागिरी कशी चालते ते सगळं मी अनुभवलं आहे.

नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 11/05/2011 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली
मागे माझ्या एका नाट्यगीतास एकदम झकास चाल लावणारे येथील सदस्य"निल्या१" (Nile नव्हे.

बटर चिकन

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 11/05/2011 03:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चिकन (Boneless) - २ Chicken breasts कांदा - १ बारीक चिरुन टोमॅटो - ४ बारिक चिरुन काजु १ तास पाण्यात भिजवुन - १०-१२ दही - ४ चमचे आले-लसुण पेस्ट - ३ चमचे तिखट -४ चमचे हळद - २ चमचे गरम मसाला - २ चमचे चिकन तंदुरी मसाला - १ चमचा काळी मिरी पावडर - २ चमचे मोठी काळी वेलची - १ हिरवी वेलची - १ दालचिनी - १ छोटा तुकडा तेजपान - २ काळी मिरी - ४-५ लवंग - ४-५ जिरे - १ चमचा कसुरी मेथी - १ चमचा Fresh cream - ४ चमचे मध - २ चमचे बटर - ३ चमचे तेल - २ चमचे मिठ चवीनुसार कृती: १. चिकन धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. २.

बालगंधर्व...

लेखक नानबा यांनी मंगळवार, 10/05/2011 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आलेत असं म्हणतात.. त्याचीच पुन:प्रचिती देणारा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे नितीन देसाई निर्मित आणि रविंद्र जाधव दिग्दर्शित बहुचर्चित "बालगंधर्व". मुळात बालगंधर्व या विषयाला हात घालण्याचं साहस करणं म्हणजे तसं कठिण. त्यात इतक्या वर्षांनंतर बालगंधर्वांना नव्या पिढीसमोर सादर करणं त्याहून कर्मकठिण. हे धनुष्य पेलायला एखाद्या ताकदवान निर्मात्याची गरज होती. आणि मराठीत सध्या नितीन देसाईंशिवाय दुसरा कोणी हे करायला धजावला देखील नसता.