मासे २२) काटी/कर्ली
काटी/करली नावावरुनच ह्याचा बोध होतो की ही काटेरी मच्छी आहे. छोटी करली दिसायला सुंदर असते. शेपुट व पर सोनेरी असतात. भरपुर काटे असतात ह्यात. त्यामुळे लहान मुलांच्या हातात देउच नका. त्यांना मांस काढून द्या. काटे भरपुर असल्याने अगदी हळू चविचविने खाण्याचा आनंद मिळतो. ही करली खुपच चविष्ट असते म्हणूनतर काटे काढण्याचा त्रास सहन करुनही आवडीने लोक खातात. करलीचे कालवणही छान लागते. इतर कालवणांप्रमाणेच हिचे कालवण करतात.
करली/काटी जर छोटी असतील तर त्यांची डोके, शेपुट काढुन, पोटातील घाण काढून तिन पाण्यांतुन धुवुन घ्यावीत.
मिसळपाव