Skip to main content

संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 22/02/2011 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, औचित्य आहे दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिवसाचं. त्या निमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली आहे. या दिवशी अधिकाधिक संपादने करून आपला सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी विकिपीडियाकडून सर्व मराठी भाषिकांना यात सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. विकिपीडियाच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणं सर्व भारतीय भाषांमध्ये मराठीतील लेखांचा तिसरा क्रमांक आहे.

व्य॑गचित्र

लेखक प्रदिप आवाड यांनी मंगळवार, 22/02/2011 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
व्य॑गचित्र चुकुन डकवायचे राहीले होते..... हे घ्या....!!! मदतीबद्दल धन्यवाद गणपा ....!!! प्रदिप आवाड

रेखाटन - पंडित भीमसेन जोशी

लेखक चाफेकळी यांनी मंगळवार, 22/02/2011 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित जी जाऊन आता जवळ जवळ महिना झाला.... तरी त्यांचा आवाज अजून आपल्यात आहे ...असणारच आहे. पंडितजींना भावपूर्ण आदरांजली . ( त्यांच्या एका फोटो वरून केलेले स्केच )

ते अलवार नाजूक,तरल क्षण.... !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 22/02/2011 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
कशे होते ते क्षण ..? तरल अनुभव .. नाजूक क्षण..! फिरून फिरून डोकावून हरवून जातेय माझे मन ते अलवार नाजूक तरल क्षण खूप छान मस्त देखणी डोळ्यात भरून हरवून गेली एकदम मनात जाऊन बसली विसरून गेले ते मी पण छान साडी नाजूक साधी नाकी डोळी सुंदर सुंदर हरवून गेले माझे मन विसरून गेले सारे मी पण त्या नजरेचा स्पर्श मुलायम ... हलके हलके बावरून मन आभाळातील शुभ्र ढग मनास पिंजून ... मनावरून फिरून गेले ते अलवार नाजूक तरल क्षण किती काळ उलटून गेला छान दिवस हरवून गेले निळ्य निळ्या आठवणीचे अजून मला स्वप्न पडते अजून मन धुंदावून...
काव्यरस

इंटरनेट हिंदू

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 22/02/2011 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट हिंदू हा काय प्रकार आहे? प्रख्यात टिव्ही पत्रकार सागरीका घोषा या विदुषी च्या टंकसाळीतून हा शब्द तयार झाला आहे. तो शब्द आता खालील अर्थाने वापरला जातो. अन्तरजालावर (ब्लॉग्ज्,फोरम्,सोशल नेटवर्कींग,मायक्रोब्लॉगिंग) सध्या काही ब्लॉगर्स हिन्दू धर्म आणि अति उजव्या राजकारणाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे लोक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराला उपयोगी पडेल आणि त्यांच्या हिडन एजेण्डा प्रत्यक्षात येण्यासाठी तरूण पिढीला तयार करीत आहेत. काही लोकांच्या मते इंटरनेट हिन्दू ह्या टर्म चा हिन्दू धर्माशी काहीही संबंध नाही.

चिकन आणि भाकरी

लेखक जासुश यांनी सोमवार, 21/02/2011 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन आणि भाकरी चिकन-५००ग्रॅम दहि हळद लाल तिखट-२ चमचे मीठ तेल चिकन मसाला टोमॅटो-१ चिरुन वाटण साहित्य सुके खोबरे - अरधी वाटी कांदे- ४ लसूण-२० पाकळ्या आले हिरवी मिरची-७-८ जिरे कोथिंबीर. चिकन ला १चमचा दही लावून मुरत ठेवावे. खोबर्‍याचे काप तव्यावर भाजून घ्यावेत.

शिवजयंतीची 'वरात'

लेखक महेश_कुलकर्णी यांनी सोमवार, 21/02/2011 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले). सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण.

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग ७

लेखक अवलिया यांनी सोमवार, 21/02/2011 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - http://misalpav.com/node/16851
मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय !