Skip to main content

किती दिवस झाले माहेराला गेले नाही

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/02/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आज वेळ मिळाला म्हणून लगोलग दोन कविता डोक्याला दोन कवीता सुचवू दिल्यात. (आपल्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल क्षमस्व.)
किती दिवस झाले माहेराला गेले नाही
काव्यरस

प्रेमकथा

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 17/02/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कथा म्हणजे नक्की काय? खरी प्रेमकथा नक्की कशी असते. इथे प्यासा चित्रपटाच्या चर्चेवर कोणीतरी प्यासा ही प्रेमकथा आहे किंवा नाही असा आक्षेप घेतला आहे. काहीजण "रजनीगंधा ,अ‍ॅपॉकॅलेप्टो ,आंधी , सुजाता इत्यादींचा उल्लेख केला आहे. एकाने तर " पिंजरा" हा प्रेमकथा असलेला चित्रपट आहे असे देखील सांगितले आहे. हिंदी मराठी भारतीय चित्रपटात नायकाला नायीका असणे हा एक आवश्यक घटक मानलेला आहे. नायक नायीकेचे प्रेम हाच एक निकष लावायचा ठरला तर महल , चलती का नम गाडी ,पाकीझा , रझीया सुलतान , ( चोरी चोरी ( मूळ चित्रपट रोमन हॉलिडे ),हाथी मेरे साथी ,क्रान्ती , देस परदेस ( मूळ चित्रपट :माय फेअर लेडी) , पासून , अ

गाणी मणिरत्नमची

लेखक निमिष ध. यांनी गुरुवार, 17/02/2011 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मिपा वर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तरी इथल्या रथी-महारथींना नमस्कार करून सुरुवात करतो. दिग्दर्शक मणीरत्नम सर्वाना एक सामाजिक आणि वेगळे विषय असणारे चित्रपट काढणारा म्हणून सुपरिचित आहेच. त्याच्या दहशदवादाच्या विषयावरील त्रिमूर्ती तर बहुतेकांनी पाहिली असेल ती म्हणजे रोजा, बॉम्बे (आता चित्रपटाचे नाव हेच होते) आणि दिल से . पण हाच दिग्दर्शक खूप अप्रतिम गाण्यांचे सादरीकरण आपल्या चित्रपटांमध्ये करतो.

याहो याहो पाव्हणं तुम्ही

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/02/2011 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
याहो याहो पाव्हणं तुम्ही
याहो याहो पाव्हणं तुम्ही जरा जवळ बसा माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||धृ|| दिवसा र्‍हाती तुमची घाई जरा बोलाया वेळच न्हाई कसं व्हाव मग मन मोकळं नका वेळ वाया घालू फुका माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||१|| मी बाई राही एकटी घरात दिस सरून जाई सरेना रात सोबतीला तुम्ही याहो तग धरला कसाबसा माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||२|| थोडं मी बोलते थोडं तुम्ही बोला दिसभराची ख्याली विचारा रात आपलीच आहे विसरू नका माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही
काव्यरस

शिरढोणचा ढाण्या वाघ

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 17/02/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिशांविरुद्ध ज्या अनेक कर्तबगार स्त्रीपुरुषांनी रान पेटवले, प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे पाहिले नाही अशा अनेक नरवीरांपैकी एक अग्रणी नाव म्हणजे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडक्यांचे कार्य माहित नाही असा सच्चा देशभक्त विरळाच होय ! आज १७ फेब्रुवारी.

पापाची भागीदारी

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 16/02/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय ग्राहक मित्रहो, यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच. यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला. उत्पादनखर्च वाढीची कारणे: १) वाढलेले डिझेलचे भाव २) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती ३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर. ४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च. खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू.

जरी वाटेल माझे बोलणे (गझल)

लेखक अजय जोशी यांनी बुधवार, 16/02/2011 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
जरी वाटेल माझे बोलणे खोटे तुला हृदय माझे कधी नव्हते दिले उसने तुला मनाशी रोजची हितगूज होती चालली तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला जगाशी भांडल्याने आपले होते हसे जगालाही मजा येते जशी येते तुला जसा हा चंद्र आकाशी बदलतो वागणे तसे आकाश त्या बदल्यात बोलवते तुला ? महागाई किती प्रेमातही बघ वाढली तरी स्वस्तात माझा भरवसा आहे तुला मला तू सोडले आहेस नाही खंत ही दिले आहे जगाशी बांधुनी नाते तुला मला सर्वांपुढे तू टाळते आहेस; पण... मला माहीत आहे कोण आवडते तुला