Skip to main content

माझे लेख चोरले गेलेत !

लेखक मितान यांनी बुधवार, 02/02/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका मित्राने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत. http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404 ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही. इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही ! मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे ! कोणती कारवाई करावी ? कशी ? कृपया आपणही आपले लेख इथे आहेत का ते बघावे.

गोष्ट माझ्या भावाची

लेखक कच्ची कैरी यांनी बुधवार, 02/02/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशा यांनी लिहायला प्रोत्साहन दिल्यामुळे ह्या सदरात लेख लिहिण्याचा श्रीगणेशा करीत आहे माझा पहिलाच लेख असल्याने काही चुकल-माकलं तर आपल म्हणून तुम्ही समजून घ्यालच (अपवाद-टारझण ) याची खात्री वाटते . तर खालील कथा ही माझ्या लहान भावाची आमच्या लहान पणीची असून ती रंगविण्यासाठी अजिबात माल-मसाला वापरला नाहीये जसे आठवले तसेच्या तासे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . माझा भाऊ पप्पू माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान ,एकुलता एक असल्यामुळे घरात सर्वांचा लाडका,(आईचा नाही ) म्हणून त्याला जराही खरचटले तर सगळ्या घरालाच ताप यायचा आणि त्यामुळेच मी आणि माझा लहान मामा (नानामामा) नेहमीच त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत

नवी पहाट ...

लेखक स्पा यांनी बुधवार, 02/02/2011 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
PHOTOSHOP च्या बेसिक ब्रश चा वापर करून, एक उगवती सकाळ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक बाप आपल्या मुलाला उगवत्या सूर्याचं रूपड दाखवतोय

नेवाळी ?

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/02/2011 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
ही वेल गेली अनेक वर्षे आहे. छाटणीमुळे विस्तार मर्यादीत असला तरी खोड बोटभर जाड झालेल. रोप आणल्यावरच काय जी फुले आली असतील ती. त्या नंतर मात्र जवळपास ५ वर्षांत फुले आली नाहीत; किंबहुना या वेलीली फुले येतात याचा विसर पडला. आणि अचानक गेल्या आठवड्यापासुन वेल बहरली. हा वेल कुंदाचा नक्कीच नाही. बहुधा नेवाळीचा असावा. कुठलाका असेना? त्यावर फुललेल्या फुलांनी खुश करुन टाकले. सकाळी जग आल्यावर प्रथम त्या फुलांवरच नजर जाते आणि मग दिवस सुरू होतो. आपल्याला आनंद देणार्‍या या छोट्या गोष्टी. बहर संपायच्या आत फुले चित्रबद्ध केली.

इजिप्त कैरो आणि हुस्नै मुबारक

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 01/02/2011 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे बाण्णव (का ब्याऐंशी ) वर्षांचे हुस्न मुबारक सत्ता सोडत नाहीतच पण तिथली जनता विषेशतः तरूण आणि स्त्रीया यांनी मनावरच घेतले आहे की त्यांना सत्तेवरून खाली खेचायचेच आणि ते रस्त्यावर उतरले आहेत. इन्टरनेट आणि टिव्ही चॅनेल्स या बातम्यांनी ओसंडून वहात आहेत. अपेक्षा आहे की याविषयावरची चर्चा रोचक आणि मनिरंजक ठरेल. ( युद्धस्यः कथा रम्या: ) मिपावर खूप चांगली आणि महत्वाची माहिती नेहमीच मिळते. एक सामान्य वाचक आणि उत्सुक मिपा सदस्य म्हणून खालील काही प्रश्न पडतात. १) या गोष्टीना असलेली पार्श्वभूमी काय?

प्राचीन ग्रंथांचे ऑनलाईन ग्रंथालय: विश्वास भिडे यांचा उपक्रम

लेखक यकु यांनी मंगळवार, 01/02/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, दासबोध, एकनाथी भागवत आणि सार्थ वाल्मिकी रामायण, महाभारताचे जवळपास सर्व खंड, ऋग्वेद, जोनाथन लिव्हींग्स्ट्न्स सीगल आणि असे सुमारे दीडशे ग्रंथ एकाच वेळी, तेही फुकट आपल्याला मिळू शकतात? होय. सांगली येथील श्री. विश्वास भिडे यांनी स्वत:च्या स्वेच्छानिवृत्तीच्या काळात पुरातन ग्रंथांना डिजीटलाईज्ड करण्याचे काम हाती घेतले आणि सुमारे दीडशे ग्रंथ अंतर्जालावर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. म.टा.

पुन्हा बालविवाह?

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 01/02/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच ही बातमी वाचली http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7403585.cms काही दिवसांपूर्वी एका समाजातील मान्यवर मनुष्याशी चर्चा झाली. हल्लीच्या नववी दहावीत असलेल्या पोरापोरींच्या वागण्यामुळे त्यांची लग्न परत पाच आठ वर्षाचे असतांना लावावी का असा तो समाज विचार करत आहे. त्यासमाजाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असलेला पगडा फार आहे. मिपाकरांना काय वाटते?