Skip to main content

वनराणी ..५

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 01/02/2011 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी..४ आश्रमाच्या पाकगृहात मी अजून प्रवेश नाही केला आहे. वासंतिका ..!! मनू ऋषींच्या अर्धांगिनी, गुरूभार्याच म्हणायला हवं वास्तविक!; त्या पाकगृह सांभाळतात. माझं भोजन पत्रावळीवर वाढून ठेवतात.. मग मी आणि साऊ दोघी भोजन करतो. मुनीवरही आवर्जून विचारपुस करतात माझी. काय कमी आहे इथे? काहीच नाही. मा', बा' तुम्ही दोघे एकदा येऊन बघा.. तुमची शबरी इथे एका ऋषींच्या आश्रमात राहते आहे. रोजचे स्त्रोत्रपठण ऐकते आहे.

डायरीतले एक पान

लेखक दादा बापट यांनी मंगळवार, 01/02/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः पान्ढरे सदन तारीखः केव्हातरी वेळः कोणतीतरी बघता बघता येथे येउन दोन वर्षे झाली. येथे आल्यापासून बाहेर जाताना घराला कूलूप लावण्याची सवय साफ गेली आहे. येथून परत शिकागोला गेलो की सुरुवातीला कूलूप लावण्यची सवय परत करून घ्यावी लागणार आहे. आजचा दिवस जरा धकाधकीचा गेला. आधी ट्युनिशिया आता ईजिप्त. ह्या लोकाना एकदम पेटायला काय झाले समजत नाही. गुप्तचर खाते काय झोपले होते? उद्या एकेकाची तासायला पाहिजे. सुएझ कनॅल ईजिप्तमधूनच जातो आणि आमचे २०% तेल सुएझ कनॅल मधूनच येते. समजा आमचे मित्र सत्तेवर आले नाहीत तर बॅरलचा भाव २०० च्या वर जाईल.

दलिया इडली आणि दोसा

लेखक मितान यांनी मंगळवार, 01/02/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
यावेळी दलिया जरा जास्तच आणला गेला. दलियाची खिचडी घरात कोणाला विशेष आवडत नाही. आणि गोड तरी किती करून खाणार. म्हणुन जालावर दलियाच्या रेसिपी शोधताना दलिया इडली सापडली. दोन तीन ठिकाणच्या रेसिपी एकत्र करून तयार झालेली ही दलिया इडली ! ज्यांना तांदूळ कमी खायचा आहे किंवा चालतच नाही अशा खवैय्यांसाठी ही एक मस्त रेसिपी आहे. ट्राय करा !

ऋतू बदलतात...

लेखक मितान यांनी सोमवार, 31/01/2011 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
ऋतू बदलतात, ऋतू हरवतातही... आणि हरवलेल्या प्रत्येक ऋतूबरोबर हरवतं मनही....येताजाता सळसळून हात उंचावत अभिवादन करणारा तरुण वृक्ष जेव्हा एका ऋतूला निरोप देताना अचानक संन्याशाची वस्त्र लेवुन समोर उभा ठाकतो तेव्हा स्तंभित होतं मन..एक एक पान गळताना बघुन गोठत जातं मन.. झाडावरचे पक्षीही भटके पंख घेऊन अज्ञातात जातात कुठेतरी...आभाळातून गळणार्‍या बर्फाच्या चुर्‍यासारखं सैरभैर पांगतं मन...बर्फाच्या त्या चुर्‍यावर पहिलं पाऊल टाकताना हलतं मन...

बूटासिंगची गोष्ट !

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 31/01/2011 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला ज्ञात असणारा इतिहास हा प्रामुख्याने काही महत्त्वाची ऐतिहासिक पात्रे आणि घटना यासंबंधीचा असतो. याव्यतिरीक्तही भूतकाळात बरेच काही घडत असते, ज्याला फारसे ’मूल्य’ नसल्याने ते कोणी लक्षात ठेवत नाही. मात्र या घटना आपल्यासोबत त्या काळाच्या काही विवक्षीत खुणा घेऊन उभ्या असतात- ज्या पाहिल्यावर आपल्याला स्वत:चाच जुना फोटो पाहिल्यावर होतो, तशा जातीचा आनंद होतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ काळ: भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि फाळणी झाली, तेव्हाचा.

ऑरेंज केक

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 31/01/2011 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
बिनामैद्याच्या ऑरेंज केकची कृती असहकार यांच्या मुलीसाठी दिली आणि लगेच ऑरेंज केक करावासा वाटू लागलाच, पण सहजरावांच्या म्हणण्याप्रमाणे एऽवढी बदाम पावडर...?

काSSSSSSयपो छे....

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 31/01/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या देशाची संस्कृती त्या देशाच्या सणांवरुन दिसते असे कोणीसे म्हंटले आहे. महाराष्ट्राची संस्कृती गणेशोत्सव दिवाळी पाडवा या सणांवरून दिसते. कोकणातला गणेशोत्सव हा अगदी आगळाच. कोकणी माणसाचा देवबाप्पाला पाहुणा म्हणून वाजतगाजत आणण्याचा उत्साह त्याच्या मनात वर्षभर गाजत असतो. गुजरातच्या पतंगोत्सवाबद्दल मी बरीच वर्षे ऐकून होतो . या वर्षी तो योग आला. संक्रान्तीच्या दिवशी गुजरातची पतंगनगरी अहमदाबाद ( गुजरातीत अमदावाद) मध्ये होतो. संक्रान्तीचा मह्त्व म्हणजे दक्षीणायन संपून उत्तरायण सुरु होते.

[ज्योतिष] आयुष्यातील उत्कर्ष आणि मध्यबिंदू ज्योतिष

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 31/01/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय ज्योतिषात योग ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे. त्यात राजयोगाला विशेष स्थान आहे. राजयोगाची फले अनेक असू शकतात पण सहसा एका सामाजिक स्तरातून दूसर्‍या वरच्या सामाजिक स्तरात जाणा-या प्रयत्नवादी, धडपडणा-या व्यक्तींच्या पत्रिकेत राजयोग किंवा इतर शुभ योग कार्यरत असल्याचे मानाले जाते. पण इथे एक गोची आहे, ती अशी की भारतीय ज्योतिषात शुभ योग सतराशे साठ आहेत, शिवाय ते बाबा आदम च्या काळातले आहेत. राजयोगाना निष्फ़ल करणारे योग सतराशे साठ गुणिले दोन (कदाचित जास्तच) आहेत. त्यामुळे भारतीय ज्योतिष वस्तुनिष्टपणे अभ्यासणा-यांची भंबेरी उडते. पाश्चात्य जोतिषात इतकी गुंतागुंत दिसून येत नाही.