Skip to main content

बायका

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 29/01/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ? एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा "पहिल्यापासूनंच शांताबाई वचक ठेवा सुनेवर नाहीतर एक दिवस,मिर्‍या वाटील डोक्यावर" दिवसभर तोंडाची अखंड चालू असते टकळी हिची सून गोरी अन् तिची सून काळी हिच्या मुलीला गेलेत 'दिवस' तिच्या मुलीला संपलाय 'आठवा' हिचा जावई काळा अन् तिचा नवरा बावळा "सांगू नका कुणाला बरं!" असं बजावून चारचारदा बातम्या देतात एकमेकींना, काय म्हणावे आता या बायकांना नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ? एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा -नाहिद नालबंद
काव्यरस

डास ढेकुण झुरळ

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 29/01/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो आपण ज्याना अगदी क्षुल्लक मानत असतो ते खरेतर खूप काही करत असतात. त्यांचे कर्तृत्व वादातीत असते. त्यांचे आपण त्यांचेकडे नीट पहात नाही. मूर्ती लहान पण कीर्ति महान असेच म्हणावं लागेल यांचे कर्तृत्व पाहून. 1 नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले.

खरेदीची सुरुवात-आजच्या सामनातील लेखन

लेखक रामदास यांनी शनिवार, 29/01/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
पिडांकाकांनी सामनातील लेख येथे प्रकाशित करावेत अशी सूचना केली आहे.त्यानुसार आजचा लेख येथे डकवीत आहे. सेकंडरी मार्केटमध्ये खरेदीची सुरुवात आज आपण करू या .या खरेदीच्या प्रस्तावापूर्वी काही महत्वाची सूत्रे . १) अ : ट्रेडींग खाते आहे आणि हातात रोख रक्कम आहे म्हणून रोज खरेदी विक्री करावी असे नाही . ब: जास्त उलाढाल म्हणजे जास्त नफा असे नाही. क: बाजारात केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत हजर राहणे सुध्दा बाजारात असण्यासारखे आहे. क्रिकेटच्या खेळात फलंदाज प्रत्येक बॉलवर रन काढतोच असे नाही. काही बॉल फक्त तटवायचे असतात ,काही बॉलवर किरकोळ धावा काढायच्या असतात.

अमेरिका खरच चंद्रावर जाऊन आली आहे का?

लेखक चिप्लुन्कर यांनी शनिवार, 29/01/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका खरच चंद्रावर जाऊन आली आहे का? मध्यंतरी या विषयावर खूप काही वाचनात आले आहे तरी यावर मिसळपाव कर मंडळीन कडून काही माहिती मिळाली तर या साठी हा काथ्याकुट .

स्पेस शटल चॅलेंजर

लेखक विकास यांनी शनिवार, 29/01/2011 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती. स्पेस शटलचे तंत्रज्ञान विकसीत करून पुन्हा पुन्हा तेच वाहन आंतराळात उपग्रह सोडण्यासाठी तसेच मानवी वावरासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी वापरणे आता नवीन राहीलेले नव्हते.

शाळेतले झुरळ

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका झुरळाने घेतला, शाळेमध्ये प्रवेश; सर्वात पुढच्या बाकावर बसले, घालून कोरा गणवेश. बाई येताच उडी मारुन, ते चाळू लागले मस्टर; घाबरुन जाऊन, फेकून मारले, बाईंनी त्याला डस्टर. झुरळाच्या पाठीत धपकन बसला, भलताच जोरात दणका; तुटला बहुदा कमरेचा त्याच्या, दुसरा – तिसरा मणका. सुसाट त्याने गाठली, समोरच्या भिंतीमधली भेग; शिक्षण राहू दे बाजूला, आपली लांबूनच बरी भेट!!
काव्यरस

ढेकणांचा अड्डा

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
काव्यरस

डासाचे गाणे

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
डासाची आई काळजीने विचारी, का रे माझ्या बाळा? माणसांच्या कानाशी गुणगुणण्याचा, तुला का बरं कंटाळा? डास म्हणाला, मी जेव्हा-जेव्हा, कानाशी गुणगुणतो जो-तो फटके मारुन मला लांब लांब घालवतो फुकट असूनही ऎकत नाही कोणीच माझं गाणं लागेल ना अशाने माझ्या करियरला कायमचंच टाळं ठरलं आता, डायरेक्ट गाठायचा सारेगमप चा सेट सादर करायचं गाणं घेऊन मान्यवरांची भेट भेट वगैरे ठीक आहे, पण जपायला सांगे आई पल्लवीमुळे प्रेक्षक वाजवती सदानकदा टाळी
काव्यरस

प्रशंसा ---> अहंकार

लेखक शुचि यांनी शनिवार, 29/01/2011 04:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ विचार वाचनात आला- तो हा की "प्रशंसा का पहेला भोग भगवान को लगाये." ज्याप्रमाणे अन्नग्रहण करण्यापूर्वी देवाला प्रसाद दाखवतो त्याप्रमाणे कोणीही आपली स्तुती केली तर तिचा मनोमन त्याग करून ती प्रथम ईश्वराला समर्पित करा. "त्वदीयम वस्तु गोविन्दम तुभ्यमेव समर्पयेत" स्तुतीपासून कटाक्षाने दूर रहा. यामुळे तुमच्या मनात अहंकाराचे बीज रोवले जाणार नाही. गर्वाने तुम्ही आंधळे होणार नाही. तुम्हाला अनाठायी(?) अभिमान वाटणार नाही इ.इ. मग माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले ते असे की "हेल्दी" अहंकार अशी काही गोष्ट असते की नसते?