Skip to main content

नारळाचे मॅकरुन्स्

लेखक गणपा यांनी गुरुवार, 27/01/2011 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
असहकार यांनी त्यांच्या मुलीसाठी बिन गव्हाच्या केकची रेसिपी सुचवण्या बद्दल धागा काढला होता. तिला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले. ही काही केकृ नाही.

ऑरेंज केक (बिनामैद्याचा)

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 27/01/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
असहकार यांच्या मुलीला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले. खास तिच्यासाठी हा बिनामैद्याचा ऑरेंज केक.. साहित्य- ३ टेबल स्पून बटर, १/४ कप साखर,२ टीस्पून मध, १/४ कप सोअर क्रिम, १/४ कप ऑरेंज ज्यूस,२ टीस्पून संत्र्याची किसलेली साल, २ अंडी,३ कप बदाम पावडर, १ टी स्पून बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ कृती- बटर पातळ करुन घ्या.त्यात साखर घाला व फेटा.अंडी वेगळी फेटून घ्या व ती त्यात घाला. मध ,सोअर क्रिम, संत्र्याच्या साली घाला व फेटा. ऑरेंज ज्यूस घाला व फेटा.

बिन मैदयाचा केक

लेखक असहकार यांनी गुरुवार, 27/01/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपावरील सुगरणींना (सुगरणाना देखील) आवाहन आणि आव्हान !!!!! माझ्या मुलीला गव्हाची अलर्जी (CELIAC DISEASE) असल्याने गहू/ मैदा विरहीत रेसीपीच्या शोधात आहे, (तांदुळ/ ज्वारी/बाजरी/मका इ. घरी दळ्लेली पीठे चालतात. ) ड्रेसिंग करता (readymade आयसींग )चालत नाही (Risk of contamination). अटी अवघड असल्याने पाकक्रुती प्रयत्न करणार्यांचे आधीच आभार ! ------------------------------------------------------------- असहकार

रंजना देशमुख.

लेखक गणपा यांनी गुरुवार, 27/01/2011 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सायली ताईंचा हा धागा आम्ही हायजॅक केला... देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा. तिथे इतर गाण्यांबद्द्ल चर्चा घडत असतानाच रंजाना या काळाच्या पडद्या आड गेलेल्या गुणी अभिनेत्रीच्या आठवणी निघाल्या.

स्वप्नांचे पान मुंबई

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 27/01/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे
काव्यरस

'स्कॅटिंग'

लेखक प्रास यांनी गुरुवार, 27/01/2011 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या एकूण होपलेस परीस्थिताचा विचार केला तर फारच डीप्रेसिंग वाटू लागतं आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग माझ्या मते काही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हा आहे. अशी गोष्ट उत्तम संगीताशिवाय कोणती असू शकते? तेव्हा एका सुंदर संगीत प्रकारावर आपण आता प्रकाश पाडणार आहोत. जाझ संगीत हे अभिजात संगीत आहे. त्याचा उद्गम अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या आफ्रिकन मूळाच्या संगीतातून झालेला असला तरीही त्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याला परंपरा आहे. मानवी मनातील अनेक भाव या संगीतातून फार छान प्रकारे दर्शवले जातात. याच जाझ संगीताचा एक प्रकार आहे, स्कॅटिंग (Scatting).

एगलेस केक

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 27/01/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
अंड्याशिवायच्या केकच्या पाककृती खूप जणांनी खव तून आणि धाग्यातून विचारल्या आहेत, बिनाअंड्याचा केक मी फारसा करत नाही.. त्यामुळे मी एगलेस केक करणार आणि फटू काढणार मग ती केकृ (केकच्या पाकृला आमच्यात केकृ म्हणतात,:) )मिपावर टाकणार.. ह्यात बराच काळ लोटेल आणि विचारणार्‍यांचा केक करण्याचा उत्साह निघून जाईल.. म्हणून केकृ देते आहे, संबंधितानी करुन पहावे आणि पुराव्यासाठी ह्या धाग्यावर फोटो टाकावेत. बिनाअंड्याच्या केकच्याही अनेक रेशिप्या आहेत, ह्या पाकृचा फोटो प्रतिसादात आला की (च) दुसरी पाकृ मिळेल. सुरुवात सोप्या केकने करुया- हा केक फार पटकन आणि छान होतो.

चूकचक्र..

लेखक गवि यांनी गुरुवार, 27/01/2011 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
3

राधा - भक्त का प्रेयसी

लेखक सायली थत्ते यांनी गुरुवार, 27/01/2011 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
घरच्या वास्तुशांतीच्या दिवशी अनेक भेटवस्तू मिळाल्या. त्यात एक राधा-कृष्णाची फ्रेम पण मिळाली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण राधेपेक्षा उंच दिसत होते, हातात बासरी होती आणि राधेनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. फ्रेम बघून माझ्या पाच वर्षांच्या भाच्यानी मला लगेच विचारलं, "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" मी एकदम दचकले. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या माझ्या उत्तरावर शांत न बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!".