Skip to main content

आपण ह्यांना पाहिलत का?

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 21/01/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या कित्येक दिवसांपासुन आमचे परममित्र श्री नितीन थत्ते हे दिसत नाहित. आंतरजालावरुन ते गायब झाले आहेत. नितीनराव , तुम्ही गेल्यापासुन आम्हाला करमत नाही. आम्हा हिंदूचे चुकते काय हे कोण सांगणार? तुम्ही गेल्यापासून कुणी काश्मीरचा धागा वर काढलेला नाही. मदनबाण आणि सहजरावांनी व्हिडो प्रतिक्रीया देणे बंद केले आहे, आजकाल वहिदाने वाद घालणे सोडले आहे, मिपावर हिंदू-मुस्लिम धागे येत नाहीत, संपादक संपादन करत नाहीत. परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो. चुचुने शीबै म्हणणे सोडून दिले. डान्राव रिकाम्या मंगल कार्यालयात आसु ढाळतात. टारोबा भावनांशी मी खेळणार नाही म्हणतात.

वन विभागाचा धिक्कार असो... support Mr. Vikaas dhus

लेखक अश्फाक यांनी शुक्रवार, 21/01/2011 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधि कधि अस्सा राग येतो म्हणुन सांगु राव , १० जानेवारी ला कराड शहरात एक बिबट्या भर वस्तित घुसला , त्याने ६ लोकांना जखमी केले , त्यातिल ३ अजुन गंभिर आहेत . त्या बिबट्याला गोळी झाडुन यमसदनी पाठवनार्या कर्तव्यदक्ष पोलिसा वर बिन्डोक वन विभागाने आज खटला दाखल केला . आता याला काय म्हनायचे पशुदया वगैरे सर्व ठिक आहे हो , जोवर ते मनुश्याच्या जिवावर येत नाही. ज्या पोलिसाचा सत्कार करयचा त्यावरच खटला , खटला खरे तर वन कर्मचार्यांवर भरला पाहिजे ज्यांनी तस्करांच्या संगन मताने जंगंल नागवले आणि वन्यजिवांना शहरात यायला मजबुर केले .

शेवभाजी

लेखक शुभांगी कुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/01/2011 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक जळगाव भागाकडे अतिशय आवडीने खाल्ला जाणारा मसालेदार आणि झणझणीत पदार्थ १)सुकं खोबरे किसुन भाजुन १ वाटी २)कांदे २ मोठे (१ पातळ चिरुन भाजुन, दुसरा बारीक चिरुन) ३)एक लाल टोमॅटो चिरुन ४)धणे १ मोठा चमचा भाजुन ५)४ लवंगा, छोटा दालचिनिचा तुकडा भाजुन ६)लसुण पाकळ्या ८-१० ७)१ छोटा चमचा तीळ भाजुन ८)लाल तिखट १ +१/२ चमचा छोटा ९)गरम मसाला १ चमचा छोटा (कांदा लसुण मसालाही वापरु शकता खमंग हवेतर) १०)१ छोटा चमचा हळद आवडत असेल तर मी टाकत नाही ११)मीठ चवीनुसार १२)कोथिंबीर अर्धी वाटी धुवुन बारीक चिरुन १३)फोडणीच साहित्य १४)तेल २ चमचे १५) गरम पाणी आणि १६)जाडी शेव (काका हलवाईची एकदम छान असते) फरसाणच्या दुकानात मिळते

माझे ३डी जीवन..

लेखक महेश काळे यांनी शुक्रवार, 21/01/2011 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
हा मझा ब्लॉग आहे.. http://my3dviamodels.blogspot.com/ येथे मी तयार केलेले काहि ३डी मॉडेल्स आहेत.. हे मॉडेल्स मी http://www.3dvia.com/products/3dvia-shape/ वापरुन तयार केलि आहेत.. तुम्हि सुद्धा करु शकता.. ही एक विनमुल्य सेवा आहे.. [त.टी. : पेहेले इस्तेमाल करे फिर विश्वास करे.. ]

झेंडा

लेखक प्रसाद_डी यांनी शुक्रवार, 21/01/2011 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
लाल चौकात तिरंगा फडकवल्य मुळे त्या अशांत कश्मीराची शांती भंग होइल त्यमुळे तीथे तीरंगा नको फडकवायला म्हनुण हे ओमर साहेब(मुख्य मंत्री आहे म्हनुन नहितर कसला सहेब अन कस्ल काय) बोंबलत आहेत. का कश्मीर भारताचा भाग नाही का? बर ईतीहास बघता कश्मीरी रजा ने त्याचे राज्य हिंदुस्थानात विलिन केले होते. मग आता तिथे सत्ता आपली, सुवीधा आपली (ज्या कही कगदा वर असतील नसतील त्या.... च्यायला या राजकारनी लोकांनी अस काही बोलायची सोयच ठेवली नाही) , सुरक्षा व्यवसस्था आपली , अजुन बरेच काय काय ते तीथे आपलच मग ती लोक का नको का म्हणतात ध्वजारोहनाला? हे सगळे आप-आपल्या पोळ्या शेकुन घेत आहेत.

ते गाणे ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 21/01/2011 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ते गाणे तिन्हीसांजेला मन माझे फुलवून गेले दूर मला माझ्या गावी मज अलगद घेऊन गेले त्या नदी किनारी झाडांची हिरवी गर्दी वळणारी पाउलवाट किती वाटत होती आपुली ती हवा मस्त होती होती गाभुळलेली मज आठवूनी गेले ती तिन्हीसांजेची गाणी तिन्हीसांजेच्या डोंगर रांगा तो नाद अनामिक येई घंटीचा किणकिणनारा....!!
काव्यरस

माईंड इज ए मिथ

लेखक यकु यांनी शुक्रवार, 21/01/2011 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वी मिसळपाव वर यु.जी. कृष्णमूर्तींबद्दल एक लेखमाला लिहिण्याचा योग आला होता. त्यात यु.जी. या व्यक्तीमत्वाबद्दल बरीच माहिती सादर करता आली असली तरी त्यात लोकांशी झालेला युजींचा वास्तविक संवाद हा अत्यंत कमी होता. यु.जी. कृष्णमूर्तींसोबत साधलेल्या संवादांचे संकलन असलेली "माईंड इज ए मिथ", "मिस्टिक ऑफ एन्लायट्न्मेंट" आणि "थॉट इज युवर एनेमी" ही पुस्तके मी पुन्हा एकदा वाचत आहे; त्यातीलच एका पुस्तकातील प्रकरणाचा मी मराठीमध्ये अनुवादीत केलेला हा काही भाग. मिसळपाव वरील वाचकांना आवडल्यास, पुढील भाग अनुवादीत करायला आनंद वाटेल; मी एरव्ही वाचणार आहेच.

कोहाळ्याचे सान्डगे

लेखक ज्योति प्रकाश यांनी शुक्रवार, 21/01/2011 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)उडिदाची डाळ २)कोहाळा ३)मिठ ४)हिन्गपूड ५)धण्याचा भरडा. ६)हिरवी मिरची चवीप्रमाणे ७)हळद कृती :-१)उडदाची डाळ भिजत घालून ४-५ तास ठेवावी. २)रात्री बारिक वाटून घ्यावी.वाटताना पाणी बेताचे घालावे. ३)कोहाळा किसून घ्यावा व वर वजन ठेवावे. ४)पाणी निघून गेले की वाटलेल्या डाळीत मिसळावा. ५)त्यात मिठ,हळद,हिन्गपूड व थोडा धण्याचा भरडा घालावा. ६)हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घालाव्या. ७)सर्व एकत्र कालवून त्याचे सान्डगे प्लासटीकवर घालावे.