Skip to main content

'बार्डसाँग्ज' - पौर्वात्य तत्त्वज्ञानाचं आख्यान

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 10/01/2011 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
Bardsongs - Poster 'बार्डसाँग्ज' हा सँडर फ्रँकेन या एका डच दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. तो घडतो मात्र गरीब देशांत. यात तीन कथा आहेत. एक राजस्थानमध्ये घडते; एक आफ्रिकेत माली या देशात, तर एक लडाखमध्ये घडते. तिन्ही कथांना लोककथांचा बाज आहे. हिंदू, मुस्लिम आणि बौध्द अशा तीन धर्मांच्या व्यक्तिरेखा यात केंद्रस्थानी दिसतात. तिन्ही कथा पौर्वात्य तत्त्वज्ञान उलगडणार्‍या बोधकथा म्हणता येतील अशा आहेत. पौर्वात्य देशांतल्या मौखिक, गीतकथनपरंपरेच्या शैलीनुसार, त्या त्या भौगोलिक परंपरेनुसार संगीत वापरून गोष्ट पुढे नेली जाते.

साळुंकी

लेखक विकास यांनी रविवार, 09/01/2011 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
(फोटोशॉप वगैरे) संस्करणविरहीत छायाचित्र. 1600×1065 pixels – 135KB ISO: 100 Exposure: 1/160 sec Aperture: 9.0 Focal Length: 200mm Latitude: 17.550000° N Longitude: 74.333333° E

विकांताची खादाडी : डाल तडका

लेखक सुहास.. यांनी रविवार, 09/01/2011 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : तुरडाळ जिरे-मोहरी कांदा टमाटे लाल मिरची मसाला हडळ...आपल हे...हळद कडीपत्ता कोंथबीर प्रमाण स्वताच ठरवायचे आहे. कृती : १ ) तुरडाळ शिजवुन घ्या . मी कुकर वापरला. (एक शिट्टी !) २) शिजेपर्यंत कांदा-टमाटे कापुन घ्या ३) कढईत आधी तेल टाका, मोहरी आणि जिरे तड-तड वाजायला लागले की चिरलेला कांदा टाका. ४) कांदा चांगला हलवुन घ्या. लाल झाला पाहिजे.

कथा गाजराच्या हलव्याची

लेखक यकु यांनी रविवार, 09/01/2011 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
हा गाजराचा हलवा अगदी स्पेशल आहे. यात अनेक प्रकारचे अनुभव मिळतील, त्यामुळे ही पाककृती काळजीपूर्वक वाचावी. आज काही काम नव्हतं आणि घरीही कुणी नव्हतं. सहज चहा प्यायला बाहेर पडलो तर बाजारात लालबुंद गाजरं विकायला आलेली दिसली. शेजारीच काजू, बदाम, किसमीस वगैरे ड्रायफ्रूटही विकायला ठेवले होते. गाजराचा हलवा करून पाहाण्याची चांगलीच संधी होती. मग एक किलो गाजरं, प्रत्येकी पन्नास ग्रॅम काजू, किसमीस आणि बदाम आणि साताठ विलायची, लिटरभर दूध असं जय्यत सामान घेऊन घरी आलो. गाजराचा हलवा आजपर्यंत कितीही वेळा खाल्ला असला तरी, प्रत्यक्ष करून पाहाण्याची पहिलीच वेळ होती.

एकटेपण...!

लेखक जयवी यांनी रविवार, 09/01/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना ह्या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो. कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूर पर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको. एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो. नंतर त्या एकांताचं रुपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई, बाबा सुद्धा हवे असतात.

माहिति पाहिजे

लेखक अनिल आपटे यांनी रविवार, 09/01/2011 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
खालील शब्दाचा अर्थ काय ? श्रीवरा = संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांची पहिली भेट कुठे झाली? कृपया मार्गदर्शन करावे अनिल आपटे

पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन

लेखक दीविरा यांनी रविवार, 09/01/2011 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन समस्त मिपाकर मायबाप, लेखनाचा पहिलाच प्रयास आहे,कृपया सांभाळून घेणे. साहित्य: १. स्वछ तुकडे पापलेटाचे हवे असतील तितके. २. लसूण आवडीनुसार. ३. आले आवडीनुसार. ४. लाल तीखट आवडीनुसार. ५. हळद चीमुटभर. ६. लिंबू. ७. गरम मसाला आवडीनुसार. ८. पिठ तांदळाचे लागेल तेवढे ९. तेल तळन्या पुरते. १०.मीठ चवीप्रामाणे. कृती: प्रथम मासा धुऊन घेणे. मग त्याला साहित्यातिल सगळे(तांदळाचे पिठ सोडुन) ईतर सगळे चोळून ठेवणे १०-१५ मीनिटस. मग तांदळाचे पिठ एका ताटात घ्या आणि त्यात पीसेस घोळवून तव्यात तळुन घेणे. फीश करी. साहित्य: १. नारळ १/२ २. लसुण ३-४ पाकळी. ३.

ऍबल कॉन एला

लेखक निनाद यांनी रविवार, 09/01/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट कथा - वय सुचवणी १५ + साठी ऍबल कॉन एला Hable con ella (इंग्रजी मध्ये - टॉक टू हर.) बेनिनो आणि मार्को एका नृत्य नाटिकेमध्ये शेजारी शेजारी बसतात. बेनिनो मार्कोला पाहतो आणि एका प्रसंगामुळे त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून तो त्याच्या लक्षात राहून जातो. बेनिनो हा पेशाने नर्स आहे आणि तो एका इस्पितळात काम करतो. त्याची अनेक वर्षे आजारी असलेली आई नुकतीच वारली आहे. या इस्पितळात बॅले नृत्य करणारी सुंदर तरुणी ऍलिशिया, अपघातात कोमात गेल्याने बेशुद्ध आहे. बेनीनी तीची सुशृषा करतो आहे. बेनीनी तिच्या प्रेमात पडलेला आहे.

भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील

लेखक भीडस्त यांनी रविवार, 09/01/2011 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना आमच्या वर्गात भावड्या नावाचा वर्गमित्र होता. भावड्या पायर्‍या पार करत करत आमच्या वर्गात पोहोचता झाला नव्हता तर एकाच पायरीवर अंमळ जास्तच रेंगाळल्याने स्वारी आमच्या बरोबर वर्गात दाखल झाली होती. त्यामुळे भावड्या इतर वर्ग सोबत्यांपेक्षा थोराडच दिसे. वर्ण देखील महाराष्ट्र देशीच्या उन्हातान्हात तापल्याने चांगलाच रापलेला. भरीत भर म्हणून त्या अनगढ वयातल्या आम्हा सगळ्या १२-१३ वर्षीय मित्रांसाठी भावड्या म्हणजे सर्वज्ञ असे. त्याच्या पोतडीतले किस्से म्हणजे अलिबाबाची गुहाच जणू. तर असा हा आमचा भावड्या आमच्या वर्गात असताना, त्या एका वर्षात त्याने उडवलेली ही काही धमाल.