राजधानीची सफर (भाग-३)
भोपाळ जंक्शनवर गाडी थांबल्यावर मी खाली उतरून जरा फलाटावर रेंगाळलो. इथे आमच्या ‘राजधानी’चे चालक, गार्ड, तपासनीस, पोलीस बदलले गेले. भोपाळ जं.वर नियोजित वेळेच्या दोन मिनिटं आधी दाखल झालेली आमची ‘राजधानी’ सुटली मात्र नियोजित वेळेच्या 4 मिनिटं उशिरा म्हणजे मध्यरात्री 2:09 वाजता.
भोपाळनंतर पाचच मिनिटांनी मोटारगाड्या वाहून नेणारी WAG-9 इंजिन जोडलेली मालगाडी भोपाळच्या दिशेने गेली. आता आमच्या ‘राजधानी’नं पुन्हा एकदा मस्त वेग पकडला होता. आता घड्याळाचे काटे पहाटेचे 3:27 वाजल्याचे दर्शवत होते.
मिसळपाव