घोळ - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - घोळ ट्रेक १९.१२.२०२१
घोळ - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - घोळ ट्रेक १९.१२.२०२१
सह्याद्रीतल्या घाटवाटांचे ट्रेक म्हणजे मनाला अतीव आनंद देणारे. निसर्गाच्या अगदी जवळ नेणारे, निसर्गाशी एकरूप व्हायला लावणारे. इथे जाऊन इथला सुखवणारा नेत्रदीपक निसर्ग पाहून, आनंदीत रोमांचित न होणारा माणूस विरळाच. हां, मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, भरपूर पायपीट करायची तयारी असावी लागते. पण खरं सांगतो ह्या घाटवाटांमध्ये फिरताना, वेळ किती गेला आणि पायपीट किती केली ह्याचं भानच राहत नाही इतका तो निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देतो.
तर असाच एक सर्वांग सुंदर घाटवाटेचा ट्रेक करायचा योग आला तो आमच्या STF (Sahyadri Trekkers Foundation) मुळे.
मिसळपाव