एकदिवसीय क्रिकेट, महिला विश्र्वचषक-2022
कुणीतरी, ह्या विषयावर धागा काढेल, असे वाटले होते, म्हणून थांबलो होतो...
2017 पासून, भारतीय महिला, ह्या प्रकारच्या खेळांत चांगल्याच प्रवीण झाल्या आहेत...
पण, व्यक्तीपूजेच्या शापातून, अद्याप तरी, ह्या संघाची सुटका झालेली नाही.
मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांना अजूनही संघात का घेतले आहे? हा एक अनाकलनीय प्रश्र्न ....
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता जास्त आहे, हे माझे वैयक्तिक मत ...
मॅॅड प्रोफेसर
नोव्हेंबरच्या थंडीतला दिवस होता. जेम्स मरे इंग्लंडच्या क्रॉथॉर्न येथे पोहोचले. ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी ते आले होते त्यांचे ब्रॉडमूर नावाचे मोठे भव्य घर असावे असे त्याने गृहीत धरले होते. ते त्यांच्या गाडीतून बाहेर पडले आणि उत्साहाने एका मोठ्या खोलीत गेले. ज्यांच्या भेटीसाठी मरे आले होते त्या माणसाचे मरेवर खूप ऋण होते.
नवीन ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचे संपादक बनून मरे यांना वीस वर्षांहून अधिक काळ लोटला होता. त्यातील सतरा वर्षे नवीन शब्दकोशाच्या निर्मितीला डॉ. डब्ल्यू सी मायनर ह्यांच्यासोबतच्या पत्रव्यवहारामुळे मोठी मदत झाली होती. त्यांनी डिक्शनरीसाठी हजारो शब्दांचे योगदान दिले होते.
निषेध व भावनिक स्फोट
चित्रपट हे मुळात मनोरंजनाचे साधन आहे. परंतु काही मोजक्या चित्रपटांतून आपले शिक्षणही होऊ शकते. काही चित्रपटात एखाद्या विशिष्ट मध्यवर्ती कल्पनेभोवती काही प्रसंग छान गुंफलेले असतात. त्यातून आपल्याला त्या विषयाची जाणीव होते. पुढे त्याचे कुतूहल वाटू शकते आणि त्यासंबंधी अधिक वाचण्याची प्रेरणाही मिळू शकते. अशा प्रकारे मी घेतलेल्या एका अनुभवावर एक लेख यापूर्वी इथे लिहिलेला आहे : पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !
नुकताच असा दुसरा अनुभव मला आला. तो विशद करण्यासाठी हा लेख.
एकदा प्राईम व्हिडिओवर ‘आज काय पहावे’ म्हणून शोध घेत होतो.
अजि सोनियाचा दिनु
अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
अजि सोनियाचा दिनु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे...
बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु
प्रगटलो अंतराळु
बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु
प्रगटलो अंतराळु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे...
अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे....
अजि सोनियाचा दिनु
कृपासिंधु करुणाकरू
कृपासिंधु करुणाकरू
नितिन देवेन मोदीवरु
बाप नितीन गडकरीवरु
मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापारी करार
पारदर्शी व्यवहार व भ्रष्टाचारा न थार
अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे....
अजि सोनियाचा दिनु
अमर्त्य
काव्यरस
झुंड
झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही 'स्टोरी टेलींग' नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.
शेन वॉर्नची अकाली एक्झिट
आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे.स्मार्टफोन घ्यायचाय - सल्ला हवा
नमस्कार मंडळी,
आजपावेतो १० हजाराच्या वरचा कधी फोन घेतला नाहीये. आता घ्यावा म्हणतो. आणि त्यासाठी सल्ला घेण्यासाठी मिपाशिवाय आणखी चांगली जागा कोणती?
गरजः
- गेमींग साठी नकोय. ऑफिसच्या कामासाठीच बहुतेक वेळ वापर होईल.
मेघ भरुनी येताना.
मेघ भरूनी येताना रिमझिम धारा झरताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.
रिमझिमती असते बरसात
चिंब चिंब भिजलेली रात
कोंब प्रीतीचे मनात माझ्या हळुवार रुजताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.
मृदगंध भारला वारा
भारी गंधाने गगन धरा
वार्यात मिसळल्या मातीच्या गंधावर झुलताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.
हे तरूवर सर्व स्तब्ध शांत
सभोती उदास हा एकांत
अंतरात या तव स्मृतींचा दिप हा जळताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.
काव्यरस
मिसळपाव