Skip to main content

बहरला पारिजात दारी...

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 06/12/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यभामा राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती , सकाळची सगळी कामं झाली, पुजा, नॆवेद्य वगॆरे, आज सगळं अगदी वेळेत झालं त्यामुळं मन कसं प्रसन्न होतं. बाहेर नुकताच हिवाळा सुरु होवुन काही काळ लोटल्यानं येणारा थोडासा निवांतपणा होता. किंचित धुकं आणि त्यातच द्वारकेतल्या घराघरातुन येणा-या धुरामुळे निर्माण होणारी तरल चित्रं पाहता पाह्ता अचानकच तिची नजर त्याच्याकडे गेली. जेंव्हा हे एकदा स्वर्गातुन परत येताना याच्या फुलांची माळ घालुन आले होते, तेंव्हा पासुन माझं मन त्याच्या साठी फार झुरत होतं. नंतर एक दोन वेळा यांच्याकडे विषय काढला, पण छे आमचं कोणि ऎकेल तर शपथ. मग मी पण शेवटचं अस्त्र उचललं.

बुलबुलचे नर्सिंग होम आणि माहेरपण

लेखक जागु यांनी सोमवार, 06/12/2010 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही नवीन घरात राहायला येऊन पाच वर्ष झाली. ह्या घरात आलो तेव्हा आम्ही घराच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेतल्या. जसे सोफा, बेड, फ्रेम्स, टिव्ही ट्रॉली, लॅम्स, झुंबर. त्यातील माझ्या आवडीचे म्हणजे झुंबर. थोडा वेगळा आणि आकर्षक म्हणून मला आणि माझ्या मिस्टरांना बाउल्सच्या आकाराचा झुंबर आवडला. ह्यात रिंग्ज मध्ये खोलगट काचेचे डिझाइन्स वाले बाउल्स बसवलेले आहेत. अगदी आवडीने आम्ही ते झुंबर लावल. कोणी पाहुणे येणार असतील किंवा घरात एखादा कार्यक्रम असेल तर आवर्जून आम्ही ह्या झुंबराची लाइट चालू करायचो. सगळ्यांना हया झुंबराच आकर्षण वाटायच. जेवढ सुंदर आहे तेवढच हे झुंबर नाजुक पण आहे.

वृद्धाश्रमातील ते खिन्न डोळे !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 06/12/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
[कोठल्याशा वृद्धाश्रमात गेलो. नि करून दृश्य बघून त्यांच्या डोळ्यातील खिन्नपणा बघून मन उदास उदास झाले. तेच शब्दात.....] वृद्धाआश्रामातील कितीतरी डोळे लागलेले असतात रविवारी संध्याकाळी मुलांच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात किती कासावीस होतात ही म्हातारी माणसे ?? घशाला कोरड पडते देव पाण्यात ठेवतात [मनातल्या मनात ...] प्रार्थना करतात ....! त्यांनी यावे म्हणून कुठे चळकण आवाज झाला तर उत्तेजित होतात त्यांची मने .... आले असतील..?
काव्यरस

सौंदर्याचा `अर्थ'

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 06/12/2010 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
"छ्या! यंदाच्या "मिस अर्थ'मध्ये काहीच अर्थ नाही! कुठल्याही ब्यूटी कॉंटेस्टमध्ये पहिल्या आलेल्या मुली कशा एसटीत बसून पोटात ढवळल्यावर उलटी दाबल्यासारखे हात तोंडावर ठेवतात....तसे हिनं का नाही ठेवले?'' चि. कुरकुरे सक्काळी सक्काळी टीव्ही बघताना चेष्टेच्या मूडमध्ये होता. ""ईईईई...काय काहितरी घाणेरडं बोलतोस रे?'' कु. किरकिरेनं त्याच्या डोक्‍यात एक टप्पल मारली. ""घाणेरडं काय? दर वेळी तसेच नाही का फोटो येत? पण ही निकोल का कोण, तिनं चक्क संपूर्ण चेहरा दाखवणारे फोटो दिलेत, म्हणून जरा शंका आली, एवढंच!'' ""बरं. कळली हा तुमची अक्कल! आता गप्प बसा.'' कु.

महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"

लेखक स्पा यांनी सोमवार, 06/12/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 भाग ४ - http://www.misalpav.com/node/15586 आज औरंगाबाद मधला शेवटचा दिवस , सुट्टीचे ४,५ दिवस कसे गेले समजलेच नाही..... भरभरून पाहून घेतलं, महाराष्ट्रात इतकं सौंदर्य असताना लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात कशाला झंक मारायला जातात देव जाणे, आधी आपलं राज्य बघा , देश बघा, आणि नं

एक प्रश्न

लेखक शिल्पा ब यांनी सोमवार, 06/12/2010 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
बाबासाहेबांच्या धाग्यावरून एक आठवले अन प्रश्न पडला... असे म्हणतात कि आंबेडकरांनी फक्त दहा वर्ष आरक्षण सांगितले होते पण नंतरच्या नेत्यांनी मत मिळवण्याच्या आशेने आत्तापर्यंत तेच चालू ठेवले आहे. आरक्षण म्हणजे आपल्यात काही कमी असेल तर मुख्य प्रवाहामध्ये कमी त्रास व्हावा म्हणून मागितले जाते ते अशी माझी समजूत...उदा. अपंगासाठी वेगळी पार्किंग वगैरे. मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत?