श्रीखंडाचा फन्ना
हल्ली मला मूळचे फारसी आणि आता मराठीत रुळलेले शब्द शोधायचा छंद लगला आहे.
काही शब्द अगदी बेमालूमपणे (बेमालूम शब्दाप्रमाणेच) मराठी भाषेत सामील (हाही तसाच) झाले आहेत.
दोन शब्दांविषयी शंका आहे.
श्रीखंड हे अगदी संस्कृतजन्य वाटणारे नाव आहे. पण फारशीत कंद म्हणजे साखर. जसे गुलकंद, कलाकंद वगैरे. आणि शीर म्हणजे दूध (जसे शीरपेडा, शीरकुर्मा). तर श्रीखंड हा शब्द हा शीर+ कंद चा अपभ्रंश आणि मुळात फारसी आहे का? संस्कृतमधे (माझ्या मर्यादित ज्ञानानुसार) श्रीखंडचा तसा काही अर्थ लागत नाही.
दुसरा शब्द फन्ना. उदा. फराळाचा फन्ना उडवला/केला. काही वर्षापूर्वी आमिरखानचा फना हा सिनेमा आला होता.
मिसळपाव