आला थंडीचा महिना
णमस्कार्स लोक्स ,
पार नोव्हेंबर उजाडला तरी ह्या वाह्यात पावसाने नुसता उच्छाद मांडला होता. दसर्याला पाउस ? हाईट म्हणजे दिवाळीतही पाऊस झाला. त्यामुळे बर्याच लोकांचे फटाके वाकस होऊन फुसके निघाले. त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल .
अरे नोव्हेंबरात काय पाऊस पडायचा असतो का? प्रत्येक ऋतुला चार-चार महिने वाटुन दिलेले असताना असं एकाने दुसर्याच्या क्षेत्रात घुसखोरी करुन वातावरणिक अवांतरगिरी करणं मला खरोखर न रुचणारं वाटलं.
मिसळपाव
स्पायडरमॅन, सुपरमॅन अगदी गेला बाजार शक्तिमान देखील आपल्याला भुरळ पाडून गेले. जादुई, साहसी जगातल्या ह्यांच्या पराक्रमाने, साहसाने आपण थक्क होत आलो आहोत. पण ह्या नायकांच्या साहस जगात नायिका तशा दुर्मिळच आणि त्यामुळेच कॅटवूमन अनेकांना भुरळ घालते ह्यात नवल नाही. कॉमिक्स मधून भेटिला येणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवूमन थेट पडद्यावर अवतरली ती २००४ साली वॉर्नर ब्रदर्सच्या 'कॅटवूमन' चित्रपटातून. कॅटवूमनच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट.