बकुळीची फुले..
बकुळीची फ़ुले..
भर दुपारी , मालू अंगाणात पडलेल्या वाळलेल्या काटक्या गोळा करत होती. उद्या सकाळी बंबाला जळण तरी होईल! काठ्या वेचता वेचता ती अंगणात एका बाजूला गंभिरपणे उभ्या असलेल्या बकुळीच्या झाडापाशी आली. नकळतच तीने वर पाहिले.. बकुळ! ......
************
"आऽऽऽऽई!! हे बघ... कित्ती फ़ुलं आली आहेत बकुळीला. उद्या आई याचा लांबच्या लांब गजरा कर मी शाळेत घालून जाईन. तुला माहितीये का.. अगं.. वर्गात एकीच्या जरी केसांत बकुळीची वेणी असेल ना.. तर दिवसभार घमघमाट असतो !! आणि ना...." जाई अखंड बडबडीत होती आणि मालू तिच्याकडे कौतुकाने पाहता पाहता तिच्यासाठी ताट वाढत होती. जाई ७ वीत होती.
मिसळपाव