Skip to main content

एक होता विदूषक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 29/11/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे. ह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग.

भरला बांगडा- (माझा म्हंटल असत पण राहु दे .)

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 29/11/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
तर्रीदार रश्श्याचे आधण गरमा गरम | स्वादिष्ट वास चौफेर, हे ची आग्रही आमंत्रण | जाहले पाट पाणी, भोवती रेघ रांगोळीची | स्वादिष्ट भोजनासाठी , इतुकेच थाट मी करी | हा भात मसालेदार अन धार तुपाची वरी | वाढते आग्रहाने, मी सुग्रण 'कोल्हापुरी' | मंडळी , कोल्हापूर अन मांसाहार याचं अतूट नात आहे. अशी चव , असं स्वयंपाक बनवण, की ज्याचा वास गल्लीभर फिरत असतो. अन रविवारी तर हा वास घराघरातून येत असतो. आज मी बनवते, सॉरी सॉरी , खिलवते आहे भरला बांगडा ! हे बांगडे !

गांधीवाद

लेखक आत्मशून्य यांनी सोमवार, 29/11/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी भारतातील खेडी भलीही आर्थीकद्रूष्टया स्वावलंबी असतील पण समाज हा अनीष्ट रूढी आणी जातिभेदाने पिचलेला होता म्हणजेच भारतीयान्चे क्षात्रतेज लयाला गेले होते, जून्या राजे लोकानी सूध्दा राज्यवीस्तारा पेक्षा गादि सांभाळणे आणी आरामी जीवन जगणे हेच भूशण मानले होते. खरे तर एकही हींदू Napoleon अथवा Alexander नीपजला नाही.

आमचा पाव - एक गाव

लेखक यकु यांनी सोमवार, 29/11/2010 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही. तास उलटतात, दुपार होते. डबा खाऊन होतो, चारचा चहासुध्दा होतो आणि हळूहळू दिवस कलून दिवेही झगमगू लागतात. तरी पावातले सोहळे काही संपत नाहीत. अगदी रातच्या साडेतीन वाजताही एखादा पावकरी दूरवर पसरलेल्या नदीत अगदी संथपणे होडीत बसून माशांचे जाळे उसवत असावा तसा दिसून येतो. काही लोक थांबावं की जावं? थोडावेळ थांबूच, नको, नको गेलेलंच बरं म्हणून डुबी मारतात, आणि आणखी पाचदहा मिनीटात श्वास कोंडला की पुन्हा एकदा डोकं वर काढतात!

पुण्याची मैना

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 28/11/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळसुट्टीत पुण्याला मामाकडे येणं झालं की दुपारच्या शांतवेळी रानमेवा विकणारे लोक चाळीत येत असत. 'डोँगरची मैना, काळी काळी मैना, पुण्याची मैना' अशी हाळी ऐकून माझी उत्सुकता वाढली. 'काय हाये वो तुमच्या टोपल्यात?' मी त्या माणसाला विचारलं तशी पोरं माझ्या अज्ञानावर हसू लागली. 'तुला साधी करवंदं माहीत नाहीत?' 'न्हाई बॉ. करवांदंबी म्हाईत न्हाई आन् पुण्याची मैनाबी.' आमच्या खेडेगावात फार क्वचितवेळा करवंदं विक्रीस येत. त्यामुळे मला हा पदार्थ नवाच होता. आईच्या मागे लागून मी एक रूपया मिळवला.

वंचना

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 28/11/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
उलुशा वरणभातात सिंधुताईंनी रात्रीचं जेवण आटोपलं, भांडी विसळली, सकाळी भिजवून ठेवलेली मटकी उपसून पंचात बांधून ठेवली आणि चिमूटभर बडीशेप खाऊन त्या पुढच्या खोलीत आल्या. नेहमीच्या सवयीने टीव्ही लावून त्या कोचावर बसून थोड्याशा सैलावल्या. आपले थकलेले पाय ताणून आणि भेगाळलेल्या टाचा एकमेकींवर टाकून चाळशीच्या वरच्या काचेतून टीव्हीकडे निर्विकार चेहर्‍याने त्या पाहू लागल्या. क्षण दोन क्षणांतच त्याचं मन अलगद टीव्हीच्या पडद्यावरून उडालं आणि पुन्हा रवीचा विचार करू लागलं. हा हा म्हणता महिना सरला सुद्धा येतोय असा फोन येऊन. उद्या तो येणार.

सोलेमस्कोगेन (नॉर्वे)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 28/11/2010 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्लोच्या उत्तरेला कोठलीशी एक टेकडी आहे असे माहीत होते. मागे अक्षय तिकडे जायचे म्हणून बसने आणि पायी बराच फिरला होता. पण खराब हवामानामुळे त्याला मधूनच मागे फिरायला लागले होते. एकदा तिकडे जाऊनच येऊ या असे म्हणत आम्ही 'सोलेमस्कोगेन'ला जाणरी ५६ नंबरची बस पकडली. या मार्गावरचा सोलेमस्कोगेन हा सगळ्यात शेवटचा थांबा आहे. इथून बस मागे वळते आणि परत ऑस्लोला जाते. जाताना तुरळक घरे दिसतात. रस्ताही थोडा वळणावळणाचा. सोलेमस्कोगेनला आम्ही बसमधून उतरलो आणि सगळीकडे पसरलेले, कापसासारखे पिंजून ठेवलेले हिम दिसू लागले.

का शब्द मी निघालो खोडून वाचलेला?....

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 28/11/2010 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
वाहून काल गेला राहून साचलेला का शब्द मी निघालो खोडून वाचलेला? वारुळ हे जगाचे - नाते जपा विषारी का डंख हा मिळाला आतून डाचलेला काळोख ही विजेचा अंगार होत आहे अंधार ही विजांनी पोळून टाकलेला सारे तुला दिले मी माझी न राहिली तू तो चोरटा निघाला माझाच वाटलेला गाणे कसे म्हणू ती आता कुठे दिसेना प्रत्येक हुन्दक्याला हा कंठ दाटलेला यात्रेत त्या फुलांच्या "गंधाळल्या" दिशा का ? कोमेजल्या फुलाने संदेश धाडलेला मी हासतो सुखाने दुःखात नांदतो मी तो चेहरा सुखाचा मी रोज फाडलेला मयुरेश साने ....दि ०९ ओक्ट-10

अंदमानमधुन सावरकरांचे नाव काढले...

लेखक अवलिया यांनी रविवार, 28/11/2010 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
खरोखर जी गोष्ट स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या करायला हवी होती ती निदान ६० वर्षांनी का होईना केली आहे. अंदमानमधील माहिती पुस्तकातुन विनायक दामोदर सावरकर हे नाव काढुन टाकले आहे. http://www.esakal.com/esakal/20101126/5636616269938258697.htm ह्याबद्दल आम्ही मायबाप सरकारचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने आमच्या काही मागण्या आहेत १) याच धर्तीवर अंदमानातील जिथे जिथे सावरकर वगैरे नाव असेल ते काढुन टाकावे २) काही बिनडोक लोक अंदमानला जावुन सावरकर होते त्या खोलीत जावुन उगाच डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात.

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर?

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 28/11/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर? ================================== केतन आणि विनीत शेजारी शेजारी राहत होते. दोघेही लहान असल्यापासून एकत्रच वाढले. दोघेही एकत्रच अभ्यास करायचे, खेळायचे. त्यांच्या आयाही एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्या दोघीही एकमेकींकडे वरचे वर जायच्या. केतन आणि विनीत हळूहळू मोठे व्हायला लागले. अभ्यासात केतन जात्त्याच हुशार होता. पण हे विनीतच्या आईस कळलं तरी मनाला पटत नव्हतं. दहावीच्या परीक्षेच्या वेळी केतन जरा आजारी पडला. विनीतची आई केतनच्या आईकडे जावून सहानुभूती दाखवायची. विचारपूस करायची. पण घरी आल्यावर का कुणास ठावूक तिला किंचित बर वाटायचं.