बाबा !!
खूप पावसाळे डोक्यावरून गेले
मोजू नये ईतकी वर्ष उलटली
परंतु तुम्ही माझ्या आठवणीत
सतत असता बाबा !!
हे शपत कुणाला
सांगायला हवे का ??
तुम्ही अचानक निघून गेलात
असे कुठे तुमचे वय झाले होते बाबा !!
आह्मी तर लहान होतो
नि आईचे तर किती छान दिवस होते
हौस-मजेचे
आणि तुम्ही एकदम निघून गेलात
अचानक !!
किती पोरके पोरके नि उध्वस्त होऊन गेलो आम्ही सर्व
दुखाचा पहाड कोसळला
आई नको त्या वयात म्हातारी झाली
पण बाबा !! काळ कुणासाठी थांबतो ??
माझी बायको मुले फक्त
तुमचा शोकेसमध्ये ठेवलेला फोटो बघतात !!
त्यांना काय वाटते ?
काव्यरस
मिसळपाव
जकार्तामध्ये सादर झालेला "लावणी दर्शना"चा अफलातून कार्यक्रम!
('मिसळ्पाव' व 'मी मराठी' दोन्हीवसंस्थळाचे सभासद असलेल्यांसाठी माहिती कीं हा लेख याआधी 'मी मराठी' या संस्थळावर प्रकाशित झालेला आहे.)
१९ नोव्हेंबर रोजी येथील "इंडिया क्लब जकार्ता"च्या विद्यमाने "लावणी दर्शन" हा एक बहारदार मराठी कार्यक्रम पहायची संधी सर्व जकार्ताकरांना मिळाली.