आपल्या समाजात एकीकडे बर्याच वैचारीक चर्चा होतात. तर त्याच वेळी दूसरीकडे जुन्या विचारसरणीचा पगडा दिसतो.
आपल्या समाजात पैसे खाणारा, गुंडगीरी करणारा, दारु पिऊन गटारात लोळाणारा, स्त्रीयांवर बलात्कार करणारा माणुस एकवेळ उजळ माथ्यानी फ़िरु शकतो तसच एखादा वेश्येकडे नेमानी जाणारा माणुससुद्धा समाजात उघडपणे वावरु शकतो पण जोरजबरदस्तीनी वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेली एखादी वेश्या, तीची मुलं, तीला सहानुभुती दाखवणारी मंडळी ही मात्र समाजाच्या दृष्टीनी नालायक ठरतात.
वेश्या, त्यांची मुलं व HIV बाधीत व्यक्तींबाबत समाजाची दृष्टी इतकी कलुषीत असते की आपण कल्पनाच करु शकत नाही.