साहित्यः बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तिखट, थोडासा गोडा मसाला, तूप, नेहमीच्या साध्या पोळीसाठी मळलेली कणिक, तांदळाची पिठी, जिरे, तेल
क्रुति: प्रथम एका ताटलीमध्ये कांदा, कोथिंबीर आणि जिरे मिक्स करुन घ्यावे. मीठ, तिखट लगेच घालू नये नाहितर पाणी सुटते. आता कणकेच्या दोन लहान लाट्या लाटून २ छोट्या पोळ्या करुन घ्याव्यात. त्यापैकी १ छोटी पोळी घेउन तिच्या एका बाजूला तूप लावून घ्या. मग एका पराठ्याला पुरेल इतके वरील कांद्याचे मिश्रण एका वाटीत/बाउलमधे घेउन त्यात चविपुरते मीठ, तिखट, थोडासा गोडा मसाला घालून हे मिश्रण एकजीव करुन ते तूप लावलेल्या पोळीवर पसरा.