Skip to main content

(((निशाण)))

लेखक अवलिया यांनी शनिवार, 13/11/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे? पराजित सारे मरून गेले जेत्यांचा भाटगण गात आहे
नसे भाट ना मी द्वेष्टा केवळ भक्त व्यासमुनींचा ज्याने लिहिली समग्रगाथा स्वजन्मरहस्य नोंदले आहे ( नकोत चर्चा व्यास कोण तो तोच का ज्याने संपादले वेद की कुणी अन्यकृत लेखन व्यासशिरी खोविले आहे)
मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे? पौरुषहीन जो संन्यस्त झाला कामलालसा घेते प्राण आहे
वेदवचने वा उपनिषदे असो मार्गदर्शक सदैव आहे कुणी उल्लंघता स्वैरपणे दोष कसा त्या ग्रंथास लागे?
पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे? धर्म रक

उखाणे हवेत........

लेखक utkarsh shah यांनी शनिवार, 13/11/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का? गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध) विश्वास आहे().

एक लोकशाहीच्या मुखवट्या मागे अनंत हुकुमशहा : एक अनुभव.

लेखक गांधीवादी यांनी शनिवार, 13/11/2010 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी घरून कामासाठी एके ठिकाणी जात असताना एक वाईट अनुभव आला. सकाळी साधारणपणे ९ च्या सुमारास पुणे-सातारा रोड वरून माझ्या दुचाकीने जात होतो. जाताना बिबवेवाडी चौकातील सिग्नल पाशी येऊन थांबलो. सकाळी ९ ची वेळ असल्याने सिग्नलवर दाटीवाटी झालीच होती. मी झेब्रा क्रोसिंग च्या मागे गाडी बंद करून शांतपणे थांबलो. आजू बाजूला सुद्धा काही गाड्या थांबल्या. तोच मागे एक कर्णकर्कश्श हॉर्न ऐकू येऊ लागला. मागे वळून पाहतो तर एक धिप्पाड व्यक्ती मला 'पुढे हो' असे हातवारे करून सांगत होती. मी तिला व्यवस्थित सांगितले कि 'बाबा रे, हिरवा सिग्नल नाहीये आता, थोडा वेळ थांब. मग पुढे जाऊ'.

..मी गरुडभरारी घेता...

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 13/11/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
..मी गरुडभरारी घेता... मी गरूडभरारी घेता.. तु हो आकाश निळे.. मी सुर्य कदाचित होता.. तु हो किरण कोवळे.. मी खट्याळा वारा होता.. तु हो सुगंध धुंद करणारा.. मी भरलेले नभ मग होता.. तु हो पाऊस कोसळणारा.. मी मिटली पापणी होता.. तु हो सुंदर स्वप्ने सारी.. मी प्रवास सुंदर मोठा तु हो वाट गुणगुणणारी.. मी कधी कंटाळवाणा होता.. तु हो आठवण हुरहुरणारी.. मी कोरा कागद उलगडलेला.. तु होऊनि ये कविता स्फुरणारी.. मी राकट मनगट होता.. तु हो मूठ ताकदवानी.. मी उचकी शेवटची होता.. तु हो पवित्र गंगेचे पाणी.. -------योगेश.
काव्यरस