Skip to main content

मनातल

लेखक प्रभा यांनी मंगळवार, 02/11/2010 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा झाला आणि बघता बघता दिवाळी समोर येऊन ऊभी राहिली. घराची आवराआवरी, साफ़सफ़ाई करताना मुख्य ऎवज असतो घरातील रद्दी! आजकाल मुख्य पेपर + त्याच्या खंडीभर पुरवण्या यांनी बघता बघता रद्दीचा डोंगर होतो. रद्दी आवरताना पुन्हा एकदा नजरेखालून पेपर जातातच. नवरात्राच्या नऊ दिवसातील पेपर व त्यांच्या पुरवण्यांमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या मंडळांच्या देवींची चित्रे, फ़ोटो व त्यांची वर्णने असतात. हे वाचून खूप चांगले वाटते म्हणूनच टाकून मात्र देववत नाही. पण त्या पेपरांचा काही उपयोगही करता येत नाही. कारण ते वापरणार कसे? कपाटात खाली कसे घालणार? फ़राळाच्या डब्यात कसे काय देवीला खाली घालणार?

घोरणे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 02/11/2010 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
घोरणे हा एक भयानक रोग/सवय आहे..अश्या माणसाच्या सहवासात झोपणे म्हणजे कठिण काम असते.. पुण्याल होस्टेल मधे असताना माझा एक राजापुरचा पार्टनर होता... त्याला घोरायची सवय होति..झोप लागली कि काहि मिनिटातच हा प्राणी घोरणे सुरु करायचा.. बर घोरण्याचा आवाज हि टिपेला असायचा..सारे होस्टेल दणाणुन सोडायचा.. एका लयीत त्याचे घोरणे चालायचे..पण मधेच ट्रक जसा गिअर बदलतो तसा हा गिअर बदलायचा.. तो पर्यंत लय व आवाजाचा डेसीबल बदलायचा मग गीअर पडला कि पुन्हा जुन्या लयीत घोरणे सुरु..बायका पण दुपारी.लवंडल्या कि घोरतात.. लग्न घरात तर लोक इतके घोरतात ..सामुदायिक घोरणे...कि एस टी स्टंड वर झोपलो कि काय असा भास होतो काहि माणसे

आई .. मिटलेला श्वास .. ५

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 02/11/2010 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
आई .. मिटलेला श्वास .. ४ http://www.misalpav.com/node/15170 पार्श्वभुमी : घरामध्ये वावरताना .. घरातील प्रत्येक गोष्टीकडे पाहताना त्या वस्तु ही आपापल्या पद्धतीने आपल्या दु:खात सामील होत आहेत असा भास कवितेतील नायकाला होतो ..
काव्यरस

मुक्ती

लेखक पारा यांनी मंगळवार, 02/11/2010 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्ती...शेकडो वर्षे ज्या विषयावर संशोधन चालू आहे त्यावर फारसा काही व्यासंग नसताना लिहिणे हे एक धाडसच म्हणावं लागेल. माणसाने आजवरच्या आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये विलक्षण प्रगती केलेली आहे. भूकंप, ज्वालामुखी सारख्या निसर्गनिर्मित भयांमधील सत्यतेचा शोध त्याने लावला. ग्रहणांना घाबरणारा मानव ह्या सावल्यांच्या खेळांना मागे टाकून, मंगळ पादाक्रांत करायची स्वप्ने पाहू लागलेला आहे. या सर्व प्रगती मागे विज्ञानाचा फार मोठा वाटा आहे.

महिला राज

लेखक प्रमोद सावंत१ यांनी मंगळवार, 02/11/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याप्रमाणे गुलामगिरी, धूम्रपान व स्त्रियांच्या अधिकारातील कमतरता इतिहासजमा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, सरंजामी वृत्ती व भ्रष्ट अकार्यक्षम लोकशाही इतिहासात जमा करणे शक्य आहे. पूर्वी स्रियांना अधिकार कमी होते. इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाहीतही शंभर वर्षांपूर्वी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत वेतन समानता तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शक्य झाली. भारतात स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले नाही. पंचायत राज आणले तेव्हा ३३% जागा स्त्रियांसाठी आरक्षित ठेवल्या. संसदेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

शब्द होती मूक तेव्हा रंगते ही भैरवी..

लेखक स्वैर परी यांनी मंगळवार, 02/11/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर ई पेपर वाचत असताना, ई-सकाळ वर एक अतिशय भन्नाट धागा सापडला आहे.मुलतानी ते भैरवी या शीर्षका खाली दिलेली रागमाला आवर्जुन ऐकवी अशी आहे. त्या बद्दल पुरविलेली महिती अशी: न्यू जर्सीच्या विश्र्व नाट्यसंमेलानात पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिराने सादर केलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाने मराठी माणसांची मने जिंकली. याच नाटकातली गाजलेली रागमाला भरतच्या सहकार्याने ई-सकाळच्या वाचकांसाठी सादर केली आहे. पुरूषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं.

भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे का?

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 02/11/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे भारताबाहेरचे दोस्त आम्हाला लै म्हणजे लै शिव्या देतात. भारतात लै भ्रष्टाचार आहे.. असे आहे तसे आहे.. च्यायला ऐकुन घ्यावं लागतं ! एक तर आपण पडलो अडाणी... जगात काय चालतं कसं चालतं याची *ट कल्पना आपल्याला नाही! पण आपले काही दोस्त आहेत... अधुन मधुन काहीतरी सांगतात... लै चांगले आहेत मनाने.. देव त्यांना भरपुर आयुष्य देवो !! आता आमचे असे पण दोस्त आहेत.. जे शिव्या देतात.. पण मन साफ आहे त्यांचं.. एकदम साफ ! भारत मोठ्ठा व्हावा असंच त्यांना नेहमी वाटतं... आणि असा मोठा व्हायला त्यांची अडचण येऊ नये म्हणुन ते लायकी असुनही दुसर्‍या देशात जातात..

काजु कतली.. मदत पाहीजे..

लेखक पंख यांनी मंगळवार, 02/11/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून मित्रांकडून काजु कतली या पदार्थाचे नाव ऐकत आहे.. मी तरी कधीही हा पदार्थ पाहिला नाही, खाण्याचे तर दूरच .. पण माझ्या मित्रांना हे समजल्यावर त्यांनी मला वेड्यात काढले. ते विश्वास ठेवायलाच तयार नाहीत कि मी काजु कतलीपासून ईतका अनभिज्ञ असेल. मलाही एकवेळ वाटले कि मला हा पदार्थ माहितीही असेल पण कदाचित वेगळ्या नावाने.. म्हणून मी मित्राला फोन करून काजु कतलीचे एक 'सुरेख' चित्र पाठवायला सांगितले..