हे सुरांनो चंद्र व्हा
हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता.
हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती.
काही अतरंगी संभाषणे.
मी तशा खुप प्रकारच्या लोकांना भेटलो आहे,त्यांच्याबद्दल जास्त काही लिहु ईच्छीत नाही,पण त्यात उच्च पातळीच्या वैज्ञानिकांपासुन ते 'भाई' ह्या श्रेणीत येणारे सर्व येतात.मग मी प्रत्येकाशी बोलताना वापरले जाणारे शब्द,चेह-यावरचे भाव इतकेच काय अंगात घातलेले कपडे ह्यांचाही विचार करतो,हे सर्व 'जैसा देस वैसा भेस' ह्या नियमाचे कटेकोर पालन व्हावं ह्या उद्देशाने केलेले असते.
पण संभाषणावेळी कधी कधी काय होतं,पुढची व्यक्ती मी गृहीत धरलेल्या तिच्या प्रतिभेला तडा जाईल असे काही शब्द बोलते,मी चाट पडतो,"अरे हेच बोलले का?".
मला जे सांगायचय ते मी काही उदारणांसहीत स्पष्ट करतो.
१) मी.नेने,ह्या माणसात तशे खुप गुण,त्यातल
बैल
दोन जिवाची घालमेल
निस्तेज सन्साराची तीन दगडी चुल मान्डण्यासाठी
१० बाय १० चे खुराडे जगण्या मरण्याच्या आणाभाका खान्यासाठी
पालिकेच्या नळाची थेम्ब थेम्ब धार
सारा सन्सार धूवून जिवाची तहान भागविण्यासाठी
सरकारचे अधीक्रुत दुकान
उच्चत्तम निक्रुष्ट दर्जाच्या धान्यासाठी
जिवाच्या करमणुकीची प्रसारमाध्यमे
ऐकुन किटतात कान अन धिजतात डोळे
कारण त्यात जाहिराती असतात बैलान्च्या
अन बातम्या असतात महाबैलान्च्या
महाबैल रवन्थ न करता पचवतो कोटीकोटी
अन त्याच सत्यकथ्येची रवन्थ करत आपण जळतो घडोघडी
महाबैलान्नी गिळ्लेल्या पेन्डीचा एक दिवस जनता करेल हिशोब
कारण सामान्य जनता ही गाय आहे
ह्या सार्या बैला-महाबैला
चेरी टोमॅटोची पिशवी.
चेरी टोमॅटोची पिशवी
५- ६ वर्षांपूर्वी आम्ही जर्मनीत एक छोट्या गावात रहात होतो. आमच्या घरा समोरच एक छोटेसे सुपर मार्केट होते, तेथे रोज लागणारया गोष्टी, भाजी व फळे मिळत. त्या दुकानासमोरच एक १२- १३ वर्षांचा मुलगा चेरी टोमॅटोच्या अर्ध्या किलोच्या पिशव्या विकत होता. जरासा गबदुलच होता.जर्मन नव्हता, अतिपूर्वेकडिल कोणत्यातरी देशातील होता. उन्हाळा खूपच असल्याने घामाने थबथबत होता. हातातील बास्केटवर "चेरी टोमॅटो २ युरो पिशवी" असा बोर्ड लावून त्या विकायचा प्रयत्न करत होता. निदान ७-८ बायकांना तरी विचारून झाले, पण पदरी निराशाच येत होती. भाजीच्या दुकानासमोर टोमॅटो विकणारया त्या मुलाचे मला कौतुक वाटले.
फराळ फटाके: जीवनाच्या दिवाळीतले!!!
सगळ्या सणांमध्ये
दिवाळीचा वेगाळाच थाट
सर्वांना अंधारामध्ये
दाखवी प्रकाशाची वाट ...
...
प्रकाश पसरवते
पणतीची पेटलेली वात
या दिवा़ळसणामध्ये
करा दु:खावर मात ...
...
निराशेच्या "भुईचक्राला"
लावून टाका आग
गोल गोल फिरत स्वतःमध्ये
निराशा होईल खाक ...
...
"फुलबाजीच्या" झगमगत्या
आनंदी तुषारांद्वारे
फुलवा मनामनांत
आनंदाचे "झाड"...
...
सद्वीचारांची ठीणगी लावा
रॉकेटच्या मुखात
महत्त्वाकांक्षेचे "रॉकेट" उडू द्या
उंचच उंच आकाशात ...
...
सुतळी "बॉम्बसारखे"
छिन्नविछिन्न होवू द्या
मनातले नकारात्मक
कीडलेले भाग ...
...
"शंकरपाळ्यांसारखी"
चौकट तोडा
बघा मोकळ्या मनाने
काव्यरस
(बॉडी डबल)
चित्र जालवरून साभार.
मिसळपाव