Skip to main content

घेरलेलं पिठलं

लेखक कच्ची कैरी यांनी शनिवार, 23/10/2010 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- बेसन्-१वाटी(मध्यम आकाराची ) कांदा-१ मोठा लसुण-७-८ पाकळ्या हळद्-अर्धा टे.स्पून लाल तिखट-२ ट्.स्पून तेल्-गरजेनुसार जीरे,मोहोरी क्रुती- १)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहोरी घालावी.जीरे,मोहोरी तड्तड्ली कि त्यात १ मोठा कांदा बारिक चिरुन घालावा. २)कांदा गुलाबीसर रंगावर परतुन घ्यावा मग त्यात बारिक चिरलेला लसुण घालावा व परतुन घ्यावे.३)नंतर त्यात हळ्द्,लाल तिखट घालुन परतुन घ्यावे व २ ते अडीच वाटी गरम पाणी घालावे. ४)पाण्याला उकळी फुटली कि त्यात हळूहळू बेसन घालायला सुरवात करावी,बेसन टाकतांना त्याच्या त्या पाण्यात गुठळ्या होनार नाहित याची काळजी घ्यावी यासाठी एका हातान

शाही शेवया

लेखक कच्ची कैरी यांनी शनिवार, 23/10/2010 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
shevayaaसाहित्य- साजुक तूप्-पाव वाटी शेवया-पाउण वाटी साखर्-अर्धी वाटी दूध-२ ते अडीच वाटी केशर काड्या-७-८ सुका मेवा-आवडीनुसार व उपलब्धतेनुसार क्रुती- १)प्रथम एका कढईत तूप गरम करावे ,तूप गरम झाले कि त्यात शेवया लालसर रंगावर परतुन घ्याव्या.जास्त लाल होउ देउ नये. २)शेवया लालसर झाल्या कि त्यात अडीच वाटी गरम दूध घालावे व ढवळुन घ्यावे व लगेच त्यात साखर घालुन परतावे. ३)आता लगेच यात केशर घालावे म्हणजे केशरचा रंग त्यात उतरेल. ४)१०-१५ मिनीट शिजु द्यावे ,शेवया

नव स्दस्य

लेखक pramanik यांनी शनिवार, 23/10/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रामाणीक आपटे, राहणारा पुणे,सध्या गुजरात संगणकतज्ञ मी ईथला नवीन सदस्य आहे.ह्यापुर्वी इतर मराठी वेबसाईटस वर लिखाण केले आहे.मिसळपाव.कॉम हे नावच आकर्षीत करणारे आहे.पण ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही. काही विषयांत माझे वाचन खुप आहे,त्याच्याच जोरावर ईथे लिहेन अस ठरवुन आलोय.ईथल्या सदस्यांचे वाद व विनोदच मला ईथे घेउन आले.काही विषयांत चाललेले वाद्,काही सदस्यांचे वागणे,काही शब्दांचा वापर व लिहलेल्या धाग्याव्यतीरीक्त होणारे असंबंध लिखाण हे मला नकोसे वाटणारे घटक. मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव सं

तुम्हाला कोणते "फटाके" आवडतात?

लेखक अवलिया यांनी शनिवार, 23/10/2010 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ आलेली आहे. हा भारतातील त्यातही हिंदूंचा सण असल्याने त्यातल्या अनेक ब-यावाईट परिणामांबद्दल जसे की फटाके फोडल्याने होणारे प्रदुषण, भरमसाठ खाण्यामुळे होणारी अन्नधान्याची टंचाई, एकमेकांना भेटुन मोठ्याने गप्पा मारुन होणारे ध्वनीप्रदुषण, सुट्ट्यांमुळे होणारी मानवी कार्यतासांची हानी, त्याचा जीडीपीवर होणारा परिणाम इत्यादी इत्यादी विषयांवर विचारवंतांच्या चर्चा सुरु होतील. आपण त्यात भाग घेण्याचे काही कारण नाही. आज आपल्याला चर्चा करायची आहे फटाक्यांविषयी... :) फटाके अनेक प्रकारचे असतात. काही आवाज करणारे असतात. तर काही नुसतेच शोभेचे असतात.

निम्मा रस्ता चालला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 23/10/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
निम्मा रस्ता चालला
पार्‍श्वभुमी:हिरो मोठ्या संकटात आहे. तो मनाला प्रश्न विचारतो. कोरस म्हणजे त्याचे +ve मनच आहे. (एक दुसराही विचार असा करता येईल:- रस्ता=जिवन, चालणे=जिवन जगणे, थांबणे= मृत्यू )
कोरसः निम्मा रस्ता चालला मागं वळतो कशाला? म्होरं जायाचं जायाचं आता थांबतो कशाला? ||धृ|| . . . . हिरो: वाट अवघड, मधी दगड बाजू करू कसा? ||१|| नाही माहित कुठं जायाचं कुना पुसू कसा?
काव्यरस

तिचं स्वप्न

लेखक रन्गराव यांनी शनिवार, 23/10/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
सुझान बॉईल ह्या गायिकेचा हा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षांसमोर गाण्याचा हा पहिलाच प्रसंग. रीयॅलटी शोमध्ये जिथं ग्लॅमर हा सर्वात मोठा भाग असतो तिथ ही खेडवळ दिसणारी स्त्री ऑडिशनसाठी आली तेंव्हा तिच हसू झाला. पण ज्याक्षणी तीने गायला सुरुवात केली तेंव्हा तो कुस्चितपणा कौतुकात बदलल. आपल्या स्वप्नांना कधी ही सोडू नये अशी प्रेरणा देनारी ही विडिओ क्लिप ( चित्र फीत अस लिहिनार होतो पण परा भाऊ.ची ईग्रचीशी नाळ तुटू नये म्हणून ही खट्पट्! ;) )

आता करा कथा....

लेखक अथांग यांनी शनिवार, 23/10/2010 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
रेच दिवस पाळत ठेवून असलेल्या घरात, आज शेवटी चोरी करण्याचा निर्णय खंडुने घेतला. घरातील तरुण मंडळी सुट्टीसाठी बाहेरगावी गेल्याचे त्याच्या हेरांनी त्याला सांगितले. आता घरात केवळ म्हातारे आजोबा. म्हणजे थोडक्यात काम फत्ते ! उच्च मध्यमवर्गीय वस्तीमधल्या ३ बेडरुम च्या घरात कुठल्या कीमती वस्तुंवर डल्ला मारता येईल याची खंडुची मनातल्या मनात उजळणी देखील करुन झाली. त्या दृष्टीने हत्यारे (टुल्स) ची जमवाजमव सुद्धा झाली. सगळ्या गोष्टी छान जुळून आल्याबद्दल त्याने मनोमन समाधानही व्यक्त केले. 'इंतजार का फल मीठा ही होता है' अशी वाक्ये आठवून खूश सुद्धा झाला.