Skip to main content

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 20/10/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....! अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....! पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....! कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....! मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण कुर्‍हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....! सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....! गंगाधर मुटे .........

आई..मिटलेला श्वास - २

लेखक गणेशा यांनी बुधवार, 20/10/2010 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आई..मिटलेला श्वास -१ http://www.misalpav.com/node/14964 पार्श्वभुमी: कातरवेळी अंधाराकडे झुकलेले नभ आणी त्या वेळेस आठवणींच्या झोक्यावर आसवांची शब्दांध रात्र श्वासधागे कशे उसवत आहे हे वर्णन तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || ----- शब्दमेघ
काव्यरस

मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव

लेखक आप्पा यांनी बुधवार, 20/10/2010 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या अच्युत गोडबोलेंच किमयागार वाचतोय. खुपच छान पुस्तक. शक्य असेल तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वाचायला द्यावे. नक्कीच सायन्सची आवड निर्माण होईल. या लेखात पुस्तकाची माहीती देत नाही पण त्याच्या प्रस्तावनेत जे स्वा. सावरकर व पु ल देशपांडे यांचे विचार मांडले ते देत आहे. प्रस्तावनाच मनाची एवढी पकड घेते की पुढील पुस्तक सोडवत नाही. सावरकरांच्या मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव या निबंधातील उतारा आहे. त्यात सावरकर म्हणतात, "आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन. ही आशा, हा अवलंब अगदी खुळचट आहे! कारण तो असत्य आहे.

ए देवबाप्पा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/10/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
ए देवबप्पा ऐकू येते का रे काही तुला त्या आरतीच्या गोंगाटात टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात लोक काय काय मागत असतात अन गार्‍हाणी सांगत असतात कुणाला काय हवे असते रुपं देही धनं देही पुत्रं देही सर्व कामांशा देही मे गात असतात किती ते तुझे गोडवे अन म्हणतात की जो गाईल ही आरती मिळेल त्याला सर्व हवे ते पण खरे सांग एकदा खरेच ऐकु येते का रे तुला? सांग ना..... ए देवबप्पा दिसते कारे काही तुला गाभार्‍याच्या बाहेरचे त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे त्या रोषणाईच्या झगमगटात? किती डोळे लागलेले असतात आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात ताटकळत उभे असतात दर्शनासाठी तुझ्यावर केलेल्या रो

सुंदर माझे घर!

लेखक नीधप यांनी बुधवार, 20/10/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक जुनी कथा इथे टाकतेय. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- खरंतर ती एक खूप सुंदर सकाळ होती. थंडीचा कडाका पडायच्या आधीची मोहक थंडी आणि कोवळ्या उन्हाचे मऊसूत कवडसे. तिच्या घरासमोरून जाणारी वाटही सुंदर सकाळीएवढीच सुंदर होती. या सगळ्या सौंदर्याच्या कल्लोळावर ओरखडा असवा तशी ती तिच्या घराच्या गॅलरीत उभी होती. परत एकदा मिनिटामिनिटाला आत आत उतरत जाणारं नैराश्य अनुभवत. इतक्या सुंदर सकाळी ती निराश का होत होती हे मात्र कोणालाच उमजण्यासारखं नव्हतं. तसं तिच्याभोवती नैराश्याचे ढग जमणं तिला नवीन उरलं नव्हतं. कधी बरं.. हा!

चेहऱ्यांचे राजकारण..................

लेखक गांधीवादी यांनी बुधवार, 20/10/2010 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
चेहरा म्हणजे काय ? दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ, गाल, कपाळ, थोडी त्वचा, त्याच्या मागे रक्त-मांसाचा चिखल. सगळ्यांचा चिखल सारखाच, त्वचा जवळजवळ सारखीच, सर्व अवयव एक ठराविक प्रमाणात, तरीसुद्धा विधात्याने प्रत्येकाचा चेहरा वेगळा केला आहे. शाहरुख खान संपूर्ण देशाला भुलवतो, तिथेच क्रूर कसाबचा चेहरा समोर आले कि मनात संताप येतो. सर्व चित्रपट जग ह्या एक चेहऱ्यावरचा आपले पोट भरते. आजकाल नेते सुद्धा चेहरा वापरून अभिनय ह्याच एका गुणाने यशस्वी होऊ पाहतात. कामावर मालकासमोर क्षणोक्षणी हा चेहराच साथ देतो. रडणारे मुलसुद्धा आईचे केवळ तोंड बघूनच शांत होते.